manipur violence : मणीपुर येथील ककचिंग जिल्ह्यातील सेरी गावात एका स्वातंत्र्यसैनिकाच्या ८० वर्षीय वृद्ध पत्नीचे घर दंगळखोरांनी पेटवून दिले. त्या आधी एका सशस्त्र गटाने त्याच्या घरावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यानंतर वृद्ध महिलेला जीवंत जाळले.
मणीपुर येथे हिंसाचारच्या घटना वाढल्या आहे. आदिवासी महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढल्या जात आहेत. यामुळे हिंसाचारात आणखी भर पडली आहे. जातीय हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून अनेक भयानक बातम्या रोज पुढे येत आहेत. येथील सेरो पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, काकचिंग जिल्ह्यातील सेराऊ गावात एका स्वातंत्र्यसैनिकाच्या ८० वर्षीय वृद्ध पत्नीचे घर दंगलखोरांनी पेटवून दिले. एका सशस्त्र गटाने आधी महिलेच्या घरावर गोळीबार केला, त्यानंतर आतमध्ये बंद असलेल्या ८० वर्षीय महिलेला आग लावली.त्यांचे पती एस चुरचंद सिंग हे स्वातंत्र्यसैनिक होते ज्यांचे वयाच्या वृद्ध महिलेला पेटवून दिले. एस चुरचंद सिंग यांच्या या पत्नी असून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता. ही घटना २८ मे च्या पहाटे घडली, जेव्हा सेरो सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि गोळीबार झाला.
एनडीटीव्हीनुसार, ३ मे रोजी हिंसाचार सुरू होण्यापूर्वी मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळपासून सुमारे ४५ किमी अंतरावर सेरी गाव आहे. मात्र आता या ठिकाणी फक्त जळालेली घरे आणि भिंतींवर गोळ्यांचे छिद्र आहेत. अनुसूचित जमाती (ST) दर्जाच्या मेईतेईच्या मागणीवरून दरी-बहुल मेईतेई आणि टेकडी-बहुल कुकी जमाती यांच्यातील संघर्षादरम्यान हे सर्वात प्रभावित गावांपैकी एक होते.
इबेतोम्बी या स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नी होत्या. त्या या गावात एका घरात राहत होत्या. दंगलखोरांच्या भीतीने त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले होते. मात्र, एका गटाने त्यांच्या गावावर हल्ला केला. त्यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला. यानंतर त्यांना जीवंत जालन्यात आले. या बाबतची माहिती त्यांचा २२ वर्षीय नातू प्रेमकांत याने एका वृत्त वाहिनीला सांगितले की, त्याचे कुटुंब त्यांना वाचवण्यासाठी पोहोचले तोपर्यंत आगीने संपूर्ण घराला वेढले होते. ज्यात त्यांच्या आजीचा मृत्यू झाला. प्रेमकांत यांनी त्यांचा मृत्यू खूप जवळून पाहिल्याचे सांगितले. त्याने आजीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी झालेल्या गोळीबारात तो स्वत: जखमी झाला. प्रेमकांत म्हणाले, "आमच्यावर हल्ला झाला तेव्हा माझ्या आजीने आम्हाला आत्ता निघून जा आणि काही वेळाने परत या. मला घेण्यासाठी परत या असे सांगितले. दुर्दैवाने, हे तिचे शेवटचे शब्द होते." त्यांची आजी तिथेच राहिली आणि म्हातारपणामुळे नीट हालचाल करू न शकल्याने असहाय्य झाली. त्यांच्या घरावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांचे घर पेटवून दिले.