Manipur News : मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला; १ जवान शहीद, ३ पोलीस जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manipur News : मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला; १ जवान शहीद, ३ पोलीस जखमी

Manipur News : मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला; १ जवान शहीद, ३ पोलीस जखमी

Updated Jul 14, 2024 04:51 PM IST

Manipur violence :मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातCRPF आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला.

मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला

Manipur attack : मणिपूरमध्ये सुरक्षा दलावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात CRPF आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकावर गोळीबार करण्यात आला आहे. सशस्त्र हल्लेखोरांनी रविवारी (१४ जुलै) सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.या हल्ल्यात सीआरपीफ चा एक जवान शहीद झाला आहे, तर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जिरीबाम जिल्ह्यातील मोनबुंग गावाजवळ गोळीबार झाला होता. त्यामुळे सीआरपीएफ आणि जिरीबाम जिल्हा पोलिसांचे पथकाकडून संयुक्तसर्च ऑपरेशन राबवत होते. या दरम्यान, घात लावून बसलेल्या हल्लेखोरांनी या पथकावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे ३ जवान जखमी झाले. या हल्ल्यात एका सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. अजय कुमार झा (वय ४३) असे शहीद सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. शहीद जवान बिहारचा रहिवासी आहे.

एप्रिल महिन्यात दोन समुदायात झाली होती हिंसा -

मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. येथे कुकी आणि मैतेई समाजामध्ये संघर्ष सुरू आहे. एप्रिल महिन्यात दोन गटात सशस्त्र हल्ला झाला होता. पुन्हा एकदा तेथे गोळीबार झाला होता. कांगपोकपी, उखरूल आणि इंफाल पूर्वमधील ट्रायजंक्शन जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना घटना होत्या. य घटनेत कुकी समुदायातील २ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सांगितले होते की,मृतांची नावे कम्मिनलाल लुफेंग (२३) कमलेंगसेट लुनकिम (२२)अशी आहेत.

 

मागील वर्षीही झाली होती हिंसा –

मागील वर्षी ३ मे रोजी मैतेई समुदायाकडून अनुसूचित जमाती (एसटी) चा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. 'आदिवासी एकजुटता मार्च'  नंतर हिंसाचार भडकला होता. या हिंसाचारात आतापर्यंत मणिपूरमध्ये १८० हून अधिक लोक मारले गेले आहेत. मणिपूरमध्ये एकूण लोकसंख्येच्या ५३ टक्के लोकसंख्या मैतेई समाजाची आहे. त्यांची वस्ती इंफाळ भागात अधिक आहे. तर आदिवासी, ज्यामध्ये नागा आणि कुकी या जातींचा समावेश आहे. या जाती डोंगराळ जिल्ह्यात राहतात.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर