मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; एनपीपी पक्षाने भाजप सरकारचा पाठिंबा काढला! आता काय होणार?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; एनपीपी पक्षाने भाजप सरकारचा पाठिंबा काढला! आता काय होणार?

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; एनपीपी पक्षाने भाजप सरकारचा पाठिंबा काढला! आता काय होणार?

Nov 18, 2024 09:46 AM IST

Manipur Violence : मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचारार वाढला आहे. राज्यातील बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनपीपीने भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढला आहे. तर दुसरीकडे अमित शहा यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर तातडीची बैठक घेतली आहे.

मणिपूरमध्ये हिंसाचार वाढला! एनपीपी पक्षाने भाजपसरकारचा पाठिंबा काढला, कॉँग्रेस आमदार देखील राजीनाने देण्याच्या तयारीत
मणिपूरमध्ये हिंसाचार वाढला! एनपीपी पक्षाने भाजपसरकारचा पाठिंबा काढला, कॉँग्रेस आमदार देखील राजीनाने देण्याच्या तयारीत

Manipur Violence : मणिपूर गेल्या वर्षभरापासून जळत आहे. येथे पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना वाढल्या असून सरकारच्या हातातून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हिंसाचाराच्या घटनेत अनेक लोकांनी जीव गमवावा असून परिस्थिती चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. तर वाढत्या हिंसाचारामुळे भारतीय जनता पक्षाला असलेला पाठींबा नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी)ने काढून घेतल्याने भाजपाची युती संपुष्टात आली आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळल्यानंतर राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. शनिवारी तीन महिलांसह ६ जणांच्या हत्येनंतर संतप्त जमावाने भाजप आमदारांची घरे जाळली होती. बेमुदत संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर एनपीपीने भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. एनपीपीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्यावर राज्यातील बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

नॅशनल पीपल्स पार्टीने बिरेन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टीने राज्यातील परिस्थिती बद्दल चिंता व्यक्त केली आहे. पक्षाचे प्रमुख कॉनराड संगमा यांनी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून मणिपूरमधील सरकार सध्याची परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीवर असक्षम असल्याचं म्हटलं आहे. यामुळे निष्पाप लोकांचे जीव जात असल्याने आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे कॉनराड संगमा यांनी पत्रात लिहिले आहे. ६० सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत भाजपकडे ३२ आमदारांचे पूर्ण बहुमत आहे. एनपीपीने पाठिंबा काढून घेतल्याने सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. एनपीपीकडे ७ आमदारांचे संख्याबळ आहे.

मणिपूरमध्ये संतप्त जमावाने इम्फाळ खोऱ्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भाजपचे आणखी तीन आमदार आणि एका काँग्रेस आमदाराची घरे जाळली. आंदोलकांनी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घरातही घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले.

अमित शहा यांनी बोलावली तातडीची बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले. सूत्रांनी ही माहिती दिली. शहा यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभा रद्द करून परतल्यानंतर लगेचच ही बैठक घेण्यात आली.

जमावाने जाळली भाजप आमदारांची घरे

जिरीबाम जिल्ह्यात तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह सापडल्यानंतर इम्फाळ खोऱ्यातील विविध भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारी संतप्त जमावाने सरकारचे तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या निवासस्थानांवर हल्ला करत जाळपोळ केली. निंगथौखोंग येथील सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंदस कोंथौजम, लंगमेडोंग बाजार येथील हयांगलामचे भाजप आमदार वाय. राधेश्याम, थौबल जिल्ह्यातील वांगजिंग तेन्था येथील भाजप आमदार पूनम ब्रोझेन आणि इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुंद्रकपाम येथील काँग्रेसचे आमदार लोकेश्वर यांच्या घरांना आग लावण्यात आली.

 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर