Ram Mandir: अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम पार पडला. या प्रकरणावरून त्यावेळीही राजकारण झाले व अजूनही या मुद्द्यावरून राजकारण होत आहे. काँग्रेसने या कार्यक्रमाचे निमंत्रण 'सन्मानपूर्वक' नाकारले होते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी मुलगी सुरन्या अय्यर यांनी राम मंदिराविरोधात सोशल मीडियावर गोंधळ घातला होता, त्याचबरोबर तिने याविरोधात तीन दिवसांचा उपवासही ठेवला होता. जंगपुरा येथील ज्या सोसायटीत ती राहते तेथील वेलफेयर असोसिएशनने २७ जानेवारी रोजी त्यांना नोटीस जारी केले आहे.
नोटिसमध्ये आरडब्ल्यूएने सुरन्याला माफी मागण्यास सांगितले आहे तसेच मणिशंकर अय्यर यांनाही आग्रह केला आहे की, त्यांनी आपल्या मुलीच्या कृत्याचा निषेध नोंदवावा. त्याचबरोबर आरडब्ल्यूएने सुरन्याला म्हटले आहे की, जर तिला वाटते की, तिने योग्य केले आहे तर तिने कॉलनी सोडून जावे.
हे पत्र भाजप नेते अमित खरखरी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पत्रावर RWA अध्यक्ष डॉ. कपिल कक्कड यांची स्वाक्षरी आहे. आरडब्ल्यूएने सांगितले की, कॉलनीमधील सर्व नागरिकांची आपापसात चांगले संबंध आहे. हे सद्भावपूर्ण संबंध कायम ठेवणे असोसिएशनची जबाबदार आहे. पत्रात म्हटले आहे की, सुरन्या अय्यर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे म्हटले ते एका शिक्षित व्यक्तीला अशोभनीय होते. राम मंदिर ५०० वर्षानंतर बनवले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निर्माण करण्यात आले आहे.
सुरन्या यांचे द्वेशपूर्ण भाषण आणि शांतताप्रिय समाजात ठेवलेला तीन दिवसांचा उपवास दुर्दैवी होता. आरडब्ल्यूएने सुरन्याला आग्रह केला आहे की, त्यांना चांगल्या नागरिकासाठी असलेले सर्व मापदंडाचे पालन केले पाहिजे. लोकांमध्ये द्वेषाची भावना पसरवण्याचे काम करू नये.