रिक्षाखाली दबलेल्या आईचा जीव वाचवण्यासाठी शाळकरी मुलगी बनली ‘बाहूबली’, पाहा व्हायरल VIDEO-mangaluru brave school girl turns auto to save mother life video goes viral ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रिक्षाखाली दबलेल्या आईचा जीव वाचवण्यासाठी शाळकरी मुलगी बनली ‘बाहूबली’, पाहा व्हायरल VIDEO

रिक्षाखाली दबलेल्या आईचा जीव वाचवण्यासाठी शाळकरी मुलगी बनली ‘बाहूबली’, पाहा व्हायरल VIDEO

Sep 10, 2024 03:11 PM IST

Viral Video : शाळकरी मुलगी पळत येऊन एकटीच रिक्षा उचलून बाजुला करते. यामुळे तिच्या आईचा जीव वाचतो. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

आईचा जीव वाचवण्यासाठी शाळकरी मुलगी बनली ‘बाहूबली’
आईचा जीव वाचवण्यासाठी शाळकरी मुलगी बनली ‘बाहूबली’

मनात जबरदस्त इच्छा असेल तर कोणतीही अशक्य कोटीतील गोष्ट सहज साध्य होते.असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून तो पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. हा व्हिडिओ मंगळूरू येथील असल्याचे सांगितले जात आहे. येथे एका मुलीची आई भरधाव रिक्षाने धडक दिल्यानंतर रिक्षाखाली दबली जाते. हे पाहून शाळकरी मुलगी पळत येऊन एकटीच रिक्षा उचलून बाजुला करते. यामुळे तिच्या आईचा जीव वाचतो. व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी मुलीच्या बहादुरीचे कौतुक केले असून तिला शौर्य पुरस्कार देण्याची मागणी होऊ लागली आहे.

ही घटना मंगळूरु येथील किन्निगोली येथील आहे. येथे एक शाळकरी मुलगी आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी एक ऑटो रिक्षा उचलून बाजुला करते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एक महिला आपल्या मुलीला ट्युशनमधून घेऊन जाण्यासाठी आलेली असते. रस्ता क्रॉस करत असताना एक भरधाव रिक्षाची तिला धडक बसते व महिला रिक्षाच्या खाली दबते. हे पाहून जवळच उभी असलेली मुलगी आईकडे धावत येते. ती आई-आई म्हणत रडत पूर्ण जोर लावून रिक्षा उचलते व बाजुला करते. मुलीच्या रडण्याचा आवाज व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकू येतो. काही वेळानंतर परिसरातील लोक त्यांच्या मदतीला येतात.

अपघात झाला त्या रिक्षामध्ये काही लोकप्रवास करत असतात.ते लोक रस्त्यावर पडतात. त्यानंतर तेहीरिक्षा सरळ करण्याचा प्रयत्न करतात. मुलगी भेदरलेल्या तिच्या आईला धीर देण्याचा प्रयत्न करते. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आणि त्यानंतर हाच व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये लोक मुलीचं भरभरून कौतुक करत आहेत.

मुलीच्या बहादुरीने वाचला आईचा जीव -

सीसीटीव्हीच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, महिला आपल्या मुलीला ट्यूशन क्लासमधून घेऊन जाण्यासाठी आलेली असते. त्यावेळी रस्ता पार करताना एक तीन चाकी रिक्षाची तिला धडक बसते. त्यानंतर ही रिक्षा महिलेच्या अंगावर कोसळते. आपली आई रिक्षाखाली दबली असल्याचे पाहून मुलगी तिच्याकडे धावत जाते व रिक्षा उचलून आईला बाहेर काढले. मुलगी केवळ आपल्या आईचा नाही तर रिक्षाखाली दबलेल्या अन्ये लोकांचाही जीव वाचवते.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स मुलीच्या साहसाचे कौतुक करत आहेत. तसेच तिला शौर्य पुरस्कार देण्याची मागणी करत आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, या मुलाला एखादा पुरस्कार द्यावा. कारण व्हिडिओ बनवण्याऐवजी ती तत्काळ मदतीसाठी धावली. आम्हाला तिच्यासारख्या आणखी तरुणांची गरज आहे.

एका महिला यूजरने लिहिले की, ही शेरनी राष्ट्रीय शौर्य पुरस्काराची दावेदार आहे. अन्य एकाने लिहिले की, मुलगी साहसी व बहादूर असल्याने पुरस्काराची हकदार आहे. अनेक लोकांनी मुलीच्या साहसाचे कौतुक केले आहे.

 

Whats_app_banner
विभाग