सोशल मीडियावर नियमितपणे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लोक डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल करतात तर कधी भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत असतो. आता तर अश्लील कृत्य करतानाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून लोक डोक्यावर हात मारून घेत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत साडी परिधान केलेली एक महिला लूना बाइक चालवताना दिसत आहे. मात्र कॅमेरा जसा तिच्या जवळ जातो, तिचा चेहरा दिसतो. त्यानंतर पाहणाऱ्याला धक्का बसतो. हा व्हिडिओ पाहून लोकांना हसू अनावर झाले आहे. बाइकवर कोणताही महिला नसून साडी परिधान केलेला माणूस आहे. व्हिडिओ बनवणारा व्यक्ती त्याला काहीतरी विचारत असून तो व्यक्तीही गंमतीशीर अंदाजात उत्तर देत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तेजीने व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर karanveer_5055 नावाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ ४ लाख २८ हजार लोकांनी पाहिला असून १६ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडिओ बनारसमधील असल्याचे सांगितले जात आहे. एका यूजरने लिहिले की, बनारसमध्ये असे कधीपासून होऊ लागले. अन्य एकाने लिहिले की, ही नारी नसून नारा आहे.
संबंधित बातम्या