लॉटरी जिंकणे आणि मोठी रक्कम घरी नेणे हे अनेकांचे स्वप्न असते. खरं तर, हे साध्य करण्यासाठी, बरेच लोक लॉटरीची तिकिटे देखील खरेदी करतात किंवा लॉटरी आधारित रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये भाग घेतात. जेणेकरून काही रक्कम जिंकता येईल. हा गेम जिंकणे निव्वळ नशिबावर अवलंबून असले तरी असे दिसते की एका अमेरिकेतील व्यक्तीला त्याच्या मृत कुत्र्याची थोडी मदत मिळाली होती.
ओहायोच्या रॉजर्स सॉर्स या तरुणाने टिफिनमधील एन वॉशिंग्टन स्ट्रीटवरील पिट स्टॉपवर बुधवारच्या पिक ५ ड्रॉइंगचे तिकीट विकत घेतले. त्याने १-०-८-२-२ असा एक अनोखा आकडा निवडला. या तिकीटावर त्याने जॅकपॉट जिंकला आणि $ ५०,००० जिंकले (अंदाजे ४१ लाख रुपये). होय, तुम्ही बरोबर वाचलंत. त्याने निवडलेल्या आकड्यांमध्ये विशेष काय आहे? बरं, तो त्याच्या मृत जर्मन शेफर्डचा लायसन्स प्लेट नंबर होता, असं UPI.com. मीडियानं म्हटलं आहे.
जिंकलेले क्रमांक लायसन्स प्लेटशी जुळतात हे कळताच सॉर्सला मोठा धक्का बसला. त्याने म्हटले की, मी दोन संच खेळले होते. त्यातील एक नंबरचा जॅकपॉट लागला होता. जो नंबर हिट झाला तो खरं तर मी खेळलेल्या माझ्या जर्मन शेफर्डसाठी माझा लायसन्स नंबर होता. तो श्वान आता आमच्यात नाही,' असं त्याने म्हटले.
ते पुढे म्हणाले, मी इथेच बसलो होतो. जेव्हा मला शक्य असेल तेव्हा मी लॉटरी पाहतो, जेव्हा लॉटरी टीव्हीवर असते आणि मी इथेच बसलो होतो. लॉटरीचा आकडा पाहून मला धक्का बसला. आपल्या बक्षिसाच्या रकमेचा उपयोग काही बिले भरण्यासाठी आणि आपले बचत खाते वाढविण्यासाठी करण्याची सॉर्सची योजना आहे.
याआधी इंग्लंडमधील डोरकिंग येथील एका वृद्ध महिलेने सेट फॉर लाईफ लोटो जॅकपॉट जिंकला होता. ७० वर्षीय डोरिस स्टॅनब्रिजने २, ११, १७, ३०, ३८ आणि लाइफ बॉल ३ या सर्व विजयी आकड्यांची जुळवाजुळव केली. विशेष म्हणजे तिला आणखी ३० वर्षे दरमहा १०,००० पौंड (अंदाजे १०.३७ लाख रुपये) मिळणार आहेत.