Viral news: पत्नीला सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेला; अन् नाइट ड्रेसमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फसला-man went to drop his wife at station got stuck in vande bharat express in a night dress viral news ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news: पत्नीला सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेला; अन् नाइट ड्रेसमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फसला

Viral news: पत्नीला सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेला; अन् नाइट ड्रेसमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फसला

Apr 03, 2024 02:43 PM IST

Vande Bharat Viral news : गुजरातमधील एक व्यक्ती पत्नीला सोडण्यासाठी स्थानकावर गेला. यावेळी पत्नीचे सामान वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ठेवण्यासाठी गेला असता, तो या गाडीत अडकून पडला.

पत्नीला सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेला; अन् नाइट ड्रेसमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फसला
पत्नीला सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेला; अन् नाइट ड्रेसमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फसला

Vande Bharat Viral news : प्रवासाला निघणाऱ्या अनेक मित्रांना अथवा नातेवाईकांना तुम्ही सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेला असाल. ऐवडेच नाही तर त्यांचे सामान देखील तुम्ही गाडीत ठेऊन देण्यास मदत केली असेल. असे करतांना गप्पांच्या नादात गाडी निघते आणि तुम्ही चालत्या गाडीतून खाली उतरलाही असाल. पण गुजरातमध्ये आपल्या पत्नीला स्थानकावर सोडण्यासाठी गेलेल्या पतीसोबत भलतेच घडले. त्यांच्या सोबत बेटलेला प्रसंग त्याच्या मुलीने सोशल मिडियावर शेयर केल्यावर ही घटना आता चांगलील व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी ही घटना ऐकून डोक्यावर हात मारून घेतला आहे.

देशातील नवीन आणि बहुचर्चित वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये गुजरातमधील एक व्यक्तीने त्याच्या पत्नीला बसून दिले. तिचे सामान ठेवण्यासाठी तो टीच्या बॅगा घेऊन वंदे भारत ट्रेनमध्ये चढला. मात्र, यावेळी अचानक गाडीला असणारा स्वयंचलित दरवाजा अचानक बंद झाला. हा दरवाजा न उघडल्याने हा व्यक्ति त्याच्या पत्नीसह वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अडकला.

शिंदे गटाच्या नेत्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई

या संपूर्ण घटनेची माहिती देताना या व्यक्तीची मुलगी कोशा हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. तिने लिहिले की तिची आई गाडीत व्यवस्थित प्रवास करू शकेल या साठी तिचे वडील गाडीत चढले. ते खाली उतरण्यापूर्वीच गाडीचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले. यामुळे तिचे वडील ट्रेनमध्ये अडकले. आणि तेवढ्यात गाडी देखील पुढच्या प्रवासाला निघाली. त्यांनी गाडीतील टीसीला याची माहिती दिली. आणि गाडी थांबवण्यासाठी इमर्जन्सी ब्रेकची लावण्याची विनंती केली. मात्र, ट्रेनचा वेग वाढला. मुलीने पुढे लिहिले की, "माझे आई आणि वडील दोघेही पहिल्यांदाच वंदे भारत एक्सप्रेने या घटनेमुळे प्रवास करू लागले. माझी आईला मुंबईला जात होती. पण तिचे वडील वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अडकल्याने त्यांना सुरतच्या पुढच्या स्टेशनवर उतरावे लागले. दरम्यान, संपूर्ण प्रवासात ते नाइट ड्रेसवर होते. सध्या ते वडोदरा येथून परतीचे तिकीट घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांची गाडी वडोदरा रेल्वे स्टेशनजवळ कुठेतरी उभी होती.

कोशाने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये त्याचे वडील ट्रेनमध्ये दिसत आहेत. "वंदे भारत आणि शताब्दी या दोन्हींचा प्रवासाचा अनुभव तिच्या वडिलांनी एकाच दिवशी घेतला. त्यांना हा प्रवास प्रीमियम प्रवासासारखा वाटला असे तिच्या वडिलांनी मजेशीर पणे त्यात लिहिले आहे.

Whats_app_banner