Man Riding Bike With His Legs: स्वत: सह इतरांचा जीव धोक्यात घालून धावत्या बाईक स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये संबंधित तरूण धावत्या बाईकवर झोपून मोबाईलमध्ये गेम खेळतोय. यावेळी त्याच्या आजूबाजुने अवजड वाहने देखील धावताना दिसत आहे. मात्र, तरीही हा तरूण जीवाची पर्वा न करता धोकादायक स्टंट करत आहे. वाहतूक नियामांचे उल्लंघन करणाऱ्या या तरुणाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणी केली जात आहे.
हा व्हिडिओ इन्स्टाग्राम युजर मंसूरने शेअर केला आहे. या व्हिडिओ एक तरुण धावत्या बाईकवर झोपून मोबाईलमध्ये गेम खेळताना दिसत आहे आणि त्याच्या पायाचा वापर करून बाईक चालवत आहे. या दरम्यान, तो बाजूने जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करतो. त्याच्या बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये हा प्रकार कैद केला.
हा व्हिडिओ २४ जानेवारी रोजी शेअर करण्यात आला होता. त्यानंतर २९ लाखांहून अधिक व्ह्यूजसह तो व्हायरल झाला असून हा आकडा अजूनही वाढतच आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. तसेच या तरुणाविरोधात कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आवाहन करण्यात आले आहे. स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रस्त्यावर स्टंट बाजी करू नका, असा इशारा पोलिस विभागाने वेळोवेळी दिला आहे.