UP Crime News : मुलगा व मुलीमधील भेद भलेही शहरातून काही प्रमाणात हद्दपार झाला असेल मात्र अजूनही देशातील ग्रामीण भागात जुन्या रुढी पंरपार लोकांच्या मनात घर करून असल्याचे दिसून येते. उत्तर प्रदेश राज्यातील बदायूंमधून असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने मुलाच्या हव्यासापोटी प्रेग्नेंट पत्नीचे पोट चिरले. यामुळे महिला गंभीररित्या जखमी झाली व तिचा गर्भपात झाला. इतकेच नव्हे तर तिच्या आतड्या बाहेर आल्या. या प्रकरणी आरोपीला कोर्टाने जन्मठेप सुनावली आहे.
पत्नीसोबत असे निघृण कृत्य करणाऱ्या या आरोपीला बदायूं जिल्हा व अप्पर सत्र कोर्टाने जन्मठेप सुनावली आहे. तसेच ५० हजाराचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास ६ महिन्याच्या शिक्षेची तरतूद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव पन्नालाल आहे. सिविल लाइन्स पोलीस ठाण्यात घोंचा गावचे रहिवासी गोलू यांनी तक्रार दाखल करत आरोप लावला होता की, त्यांची बहीण अनीताचे तिच्या पतीने पन्नालाल याने पोट चिरले होते.
महिलेच्या भावाने आरोप लावला होता की, अनिताने ५ मुलींना जन्म दिला होता. यामुळे तिचा पती तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. तसेच दुसरा विवाह करण्याची धमकी देत होता. या घटनेवेळी महिलेचे वय ३० वर्षे होते व ती ८ महिन्यांची गर्भवती होती.
एके दिवशी पतीने अनिताशी वाद सुरू केला. आरोपीने महिलेला म्हटले की, तू नेहमी मुलींना जन्म देतेस. यावेळी तुझे पोट फाडून पाहतो मुलगा आहे की मुलही. त्यानंतर पन्नालालने अनिताचे पोट धारदार शस्त्राने फाडले. यामुळे महिलेच्या आतड्या बाहेर आल्या व ८ महिन्याच्या शिशुचा गर्भपात झाला. विशेष म्हणजे हा शिशू मुलगा होता. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला.
लैला खान बेपत्ता होण्यापूर्वी इगतपुरीत लैलाची आई शेलिनाचा तिसरा पती टाक सोबत दिसली होती. ओशिवरा येथील फ्लॅट व दुकान, मीरारोड येथील आणखी एक फ्लॅट, इगतपुरी येथील फार्महाऊस असा ऐवज दागिने व रोख रकमेसह हडप करायचा असल्याने त्याने त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. टाक लैला आणि तिच्या बहिणींना वेश्या व्यवसायात ढकलू इच्छित होता, असा आरोप तिचे सावत्र वडील आणि शेलिनाचा दुसरा पती आसिफ शेख यांनी केला होता.