Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून तिला जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्या झालेल्या तरुणीच्या बहिणीच्या नवऱ्याला अटक केली आहे.
आरोपीने पत्नीच्या बहिणीला मारण्यासाठी बँकेतून लोन काढून तिची हत्या करण्यासाठी दोघांना ३० हजार रुपयांची सुपारी दिली. तिची हत्या करण्यापूर्वी आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसोबत तिच्यावर सामूहिक बलात्कारही केला. त्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी तिघांनी मिळून तरुणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. खून झालेली तरुणी ही बहिणीच्या नवऱ्याला ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुजफ्फरनगर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा खुलासा केला. यामध्ये मुजफ्फरनगरचे एसपी देहात आदित्य बन्सल यांनी सांगितले की, २३ जानेवारी रोजी बुधना पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील व्यक्तीने या प्रकरणी तक्रार दिली होती. त्याच्या मुलीला कलग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मवाना येथील रहिवासी असलेल्या त्यांचा जावई आशिष आणि त्याचे साथीदार शुभम आणि दीपक यांनी एका लग्नासाठी घेऊन गेले होते. तेव्हापासून त्यांची मुलगी बेपत्ता होती. एसपी देहात यांनी सांगितले की, संशयाच्या आधारे बुधना पोलिस ठाण्याचे प्रभारी आनंददेव मिश्रा यांनी आरोपी आशिषला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. यानंतर त्याने त्याने खुनाची कबुली दिली.
त्याने दिलेल्या माहितीनुसार तरुणीचे नानू कालव्याच्या कच्च्या ट्रॅकवर असलेल्या बांबूच्या झुडपात पोलिसांना मुलीच्या जळालेल्या मृतदेहाचे अवशेष सापडले. पोलिसांनी तेथून मानवी कवटी, अर्धवट जळालेले कपडे, अंगठी, हेअर कल्चर, केस, कंडोम आदी साहित्य जप्त केले आहे. चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर पत्नीच्या धाकट्या बहिणीशी त्याचे बोलणे वाढले. दोघांमध्ये जवळीक वाढून त्यांच्यात संबंध टायर झाले. मात्र, याचा तिने गैरफायदा घेत जावयाला ब्लॅकमेल करत पैशांची मागणी करत होती. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. या प्रकाराला आरोपी कंटाळला होता.
आरोपी दौराळा येथील आर्यव्रुत हॉस्पिटलमध्ये काम करत असून मेहुणी ब्लॅकमेल करत असल्याने तो कंटाळला होता. यामुळे त्याने त्याचे साथीदार शुभम आणि दीपक या दोघांना सोबत घेऊन हत्येचा कट रचला. या साठी त्याने बँकेकडून लोन घेऊन दोघांना साथीदारांना ३० हजार रुपये दिले होते. ठरल्याप्रमाणे तिघांनी मुलीला सोबत घेऊन नानू कालव्याच्या कच्च्या ट्रॅकवर नेले. या ठिकाणी तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर मुलीचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून मृततरुणीची कवटी, क्लीचर आदी वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तर त्याच्या दोन साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
संबंधित बातम्या