हे ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल तसेच धक्की बसेल की, इटलीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला एकाचवेळी कोविड १९, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही संक्रमण झाले. घशात खवखव, डोकेदुखी, अशक्तपणा जाणवणे तसेच अंगात ताप आल्यानंतर व्यक्तीने केलेल्या टेस्टनंतर ह माहिती समोर आली. जगातील आतापर्यंतचे हे पहिलेच प्रकरण आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीला तीन भयंकर आजारांनी एकाच जखडले असेल.
‘जर्नल ऑफ इन्फेक्शन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये या व्यक्तीचे नाव दिलेले नाही. रिपोर्टनुसार, ही व्यक्ती पाच दिवस स्पेनमध्ये पिकनिकसाठी गेला होता. तेथून परत आल्यानंतर ९ दिवसांनंतर त्याला ही सर्व लक्षण जाणवू लागली. लक्षण जाणवू लागल्यानंतर तिसऱ्या दिवशी केलेल्या चाचणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
उसके चेहऱ्यावर व शरीराच्या अन्य भागावर लाल चट्टे दिसू लागले तसेच फोडही येऊ लागल्यावर व्यक्ती रुग्णालयातील इमर्जेंसी डिपार्टमेंट पोहोचला. त्यानंतर त्याला संक्रमक आजारांच्या विभागात पाठवण्यात आले.
रिपोर्टनुसार संक्रमित व्यक्तीच्या शरीराच्या अन्य भागाबरोबरच पार्श्वभागावरही फोड आले होते. त्यानंतर केलेल्या टेस्ट रिपोर्टमध्ये मंकीपॉक्स आणि एचआयव्ही संक्रमणही कन्फर्म झाले. SARS-CoV-2 जिनोम सीक्वेन्सिंग चाचणीत समजले की, त्याला ओमिक्रॉनचा सब-व्हेरिएंट BA.५.१ चे संक्रमण झाले आहे. या व्यक्तीने फायझरच्या दोन्ही लसींचा डोस घेतला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची केस स्टडी जर्नलमध्ये १९ ऑगस्ट रोजी छापून आली होती. कोविड १९ आणि मंकीपॉक्समधून मुक्त झाल्यानंतर व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले होते, मात्र आता एचआयव्हीवरील उपचार बाकी आहेत.