मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: जाता- येता चेष्टा करायची म्हणून दिवसाढवळ्या तरुणीला चाकूनं भोकसलं; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Viral Video: जाता- येता चेष्टा करायची म्हणून दिवसाढवळ्या तरुणीला चाकूनं भोकसलं; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 24, 2024 02:15 PM IST

Delhi Man Stabs Woman: दिल्लीतील मुखर्जी नगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणीवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

दिल्लीत दिवसाढवळ्या तरुणीवर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी एका व्यक्तीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दिल्लीत दिवसाढवळ्या तरुणीवर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी एका व्यक्तीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Man stabs woman In Delhi: दिल्लीतील मुखर्जी नगर मध्ये एका तरुणीवर दिवसाढवळ्या चाकूहल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात आरोपी तरुणीवर चाकूने हल्ला करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमन असे आरोपीचे नाव असून तो परिसरातील पेइंग गेस्ट च्या निवासस्थानात स्वयंपाकी म्हणून काम करतो. मुखर्जी नगरमध्ये राहणारी तरुणी जाता- येता त्याची चेष्टा करायची आणि त्याला वेड्यात काढायची, अशी माहिती अमनने पोलिसांना दिली. तरुणीच्या नेहमीच्या टोमण्यांना वैतागून आरोपीने जवळच्या भाजी विक्रेत्याकडील चाकू घेऊन आणि तरुणीला भोकसला. त्यावेळी एका पादचाऱ्याने मध्यस्थी करून तरुणीला वाचवले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची प्रकृती स्थिर असून ती धोक्याबाहेर आहे.

धक्कादायक..! ट्रेन अपघातात मृत व्यक्तीचा तुटलेला पाय घेऊन गेला माथेफिरू अन् चक्क खाऊ लागला

घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पीडित तरुणीच्या दिशेने धावताना दिसत आहे. तो तिला बळजबरीने जमिनीवर ढकलतो आणि तिच्यावर चाकूने हल्ला करतो. अंदाजे चार ते पाच वेळा तो पीडिताला चाकू भोकसतो. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या एका व्यक्तीने मध्यस्थी करून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. समोरच्याने प्रयत्न करूनही आरोपी पळून जातो आणि पुन्हा एकदा तरुणीवर हल्ला करण्यासाठी येतो. त्यावेळी आणखी एक व्यक्ती पीडिताच्या मदतीला धावते. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जातो.  याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

IPL_Entry_Point

विभाग