Sydney Bondi Junction Mall stabbing : ऑस्ट्रेलिया येथील सिडनीच्या पुर्व उपनगरात बोंडी जंक्शन येथे असणाऱ्या एका मॉलमध्ये आज एक भयंकर हल्ला झाला. मॉलमध्ये शॉपिंगसाठी आलेल्या नागरिकांवर एका हल्लेखोराने चाकूने हल्ला केला. त्याच्या या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. तर चार नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मॉल रिकामा केला आहे. तसेच हल्लेखोर आणि पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत हल्लेखोर ठार झाला आहे.
सिडनीच्या पुर्व भागात बोंडी जंक्शन येथे एक मोठा मॉल आहे. आज शनिवार असल्याने अनेक नागरिक या ठिकाणी शॉपिंगसाठी आले होते. दरम्यान, दुपारी १२ च्या सुमारास एका माथेफिरू हातात चाकू घेऊन या मॉलमध्ये घुसला. त्याने येथील नागरिकांवर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. तर काहींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार या घटनेत चार नागरिक ठार झाल्याची शक्यता वर्तवन्यात आली आहे. तर काही नागरिक जखमी झाल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी संपूर्ण परिसर सील केला असून मॉल मधील नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना देखील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिस आणि हल्लेखोर यांच्यात झालेल्या चकमकीत हल्लेखोर ठार झाला असल्याची देखील माहिती आहे. हल्लेखोराच्या हातात कोयता सदृश हत्यार दिसत असून याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला ठार मारल्याची माहीटी आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांचा हात आहे का ? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सिडनीमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
न्यू साउथ वेल्स पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, या संध्याकाळी ४ वाजण्याच्या आधी (0600 GMT) आपत्कालीन सेवांना वेस्टफील्ड बोंडी जंक्शनवर बोलावण्यात आले. “लोकांना या परिसरात न येण्याचे आवाहन देखील करनेत आले आहे. या घटनेच्या संदर्भात चौकशी सुरू आहे आणि अधिक तपशील नाहीत."
एका संकेतस्थळांनुसार या घटनेनंतर शेकडो लोकांना शॉपिंग सेंटरमधून बाहेर काढण्यात आले. ब्रॉडकास्टर एबीसीने सांगितले की काही लोक आत अडकले आहेत. दोन साक्षीदारांनी रॉयटर्सला सांगितले की त्यांनी गोळीबार झाल्याचे ऐकले.
ऑस्ट्रेलियन पोलिसांनी शनिवारी सांगितले की त्यांना सिडनीतील एका शॉपिंग सेंटरमध्ये अनेकांवर चाकूने हल्ला झाल्याची माहिती मिळाली. शनिवारी दुपारी दुकानदारांनी खचाखच भरलेल्या वेस्टफिल्ड बोंडी जंक्शन मॉल कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडल्या. सध्या हा मॉल रिकामा करून सील करण्यात आला आहे. न्यू साउथ वेल्स रुग्णवाहिकेने एएफपीला सांगितले की पोलिसांनी एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार केले. हा व्यक्ति हल्लेखोरांपैकी एक असल्याचे समजते.