Blinkit News: आजकाल ऑनलाइन वस्तू ऑर्डर करणे सामान्य झाले आहे. रेशन, खाद्यपदार्थ आणि कपड्यांपासून बऱ्याच काही ऑनलाइन ऑर्डर करतात. काही अॅप असे आहेत की, त्यावरून ऑर्डर केलेली वस्तू काही मिनिटांतच घरपोच होते. मात्र, घाईगडबडीत ग्राहकांना अशा काही वस्तूंची डिलिव्हरी होते, ज्याची स्वप्नातही कल्पना केली नसेल. असेच काही एका व्यक्तीसोबत घडले, ज्याने ब्लिंकिटवरून पुरुषाचे अंडरगारमेंट ऑर्डर केले. परंतु, त्याला महिलेचे अंतर्वस्त्र मिळाले.
प्रियांश नावाच्या व्यक्तीने ब्लिंकिट ॲपवरून जॉकीचे अंडरगारमेंट ऑर्डर केले. मात्र महिलांचे अंतर्वस्त्र प्रियांशला देण्यात आले. याबाबत प्रियांशने हेल्प सेंटरमध्ये तक्रार केली असता ते रिटर्न करण्यात आले नाही आणि प्रियांशला त्याचे पैसेही परत मिळाले नाहीत. प्रियांशने सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.
प्रियांश म्हणाला की, त्याने ब्लिकिंटवरून पुरुषांची अंडरगारमेन्ट ऑर्डर केली. परंतु, त्याला महिलेचे अंतर्वस्त्र मिळाले. याबाबत त्याने ब्लिंकिटवर तक्रार केली आणि अंडरगारमेंट बदलण्याची विनंती केली. परंतु, ब्लिंकिटने त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आणि परतावा देण्यास नकार दिला. यामुळे प्रियांशला लेडीज अंडरगारमेंट परिधान करावी लागली, ज्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
सोशल मीडियावर महिला अंडरगारमेंटचा फोटो शेअर करताना प्रियांशने लिहिले की, ‘ब्लिंकिटने माझे पैसे परत करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता मी पराभव स्वीकारला आहे.’ प्रियांशच्या या पोस्टला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘कंपनीकडून ग्राहकांना चुकीची डिलिव्हरी केली जात असेल तर, ती वस्तू बदलून देण्याची जबाबदारी देखील त्यांची आहे.’ दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘ब्लिंकिटने संबंधित ग्राहकाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता त्याने निवारण केले पाहिजे’. आणखी एका युजरने लिहिले आहे, 'भावाने लढण्याऐवजी शरणागती परत्कारली.'