Uttarakhand News : मृत समजून अंत्यसंस्कार केलेला माणूस तब्बल ६४ वर्षानंतर परतला घरी; कुटुंबाला बसला धक्का-man presumed dead returns home after 64 years in uttarakhand ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Uttarakhand News : मृत समजून अंत्यसंस्कार केलेला माणूस तब्बल ६४ वर्षानंतर परतला घरी; कुटुंबाला बसला धक्का

Uttarakhand News : मृत समजून अंत्यसंस्कार केलेला माणूस तब्बल ६४ वर्षानंतर परतला घरी; कुटुंबाला बसला धक्का

Aug 08, 2024 12:26 PM IST

Uttarakhand News : उत्तराखंड येथे तब्बल ६४ वर्षांपासून बेपत्ता असलेला व घरच्यांनी त्याला मृत घोषित केलेला एक वृद्ध व्यक्ति घरी परतला. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

मृत समजून  अंत्यसंस्कार केलेली व्यक्ति तब्बल ६४ वर्षानंतर परतली घरी; कुटुंबाला बसला धक्का
मृत समजून अंत्यसंस्कार केलेली व्यक्ति तब्बल ६४ वर्षानंतर परतली घरी; कुटुंबाला बसला धक्का

Uttarakhand News : मूळचा नेपाळ येथील असलेला एक व्यक्ति उत्तराखंड येथील एका गावांतून तब्बल ६४ वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. हा व्यक्ति १७ वर्षांचा असतांना कामाच्या शोधात पिथौरागढ येथे कामाला आला होता. मात्र, हा व्यक्ति अचानक बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करत त्याच्यावर मृत्यूनंतरचे सर्व विधी केले. मात्र, तब्बल ६४ वर्षांनी हा व्यक्ति अचानक घरी परतल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या व्यक्तीचे वय ८१ वर्ष असून त्याला पाहून सर्व अचंभीत झाले आहेत.

नरसिंग रौतके असे या व्यक्तीचे नाव आहे. सध्या त्याचं वय हे ८१ वर्ष आहे. नर सिंग रौतके नेपाळमधील आपल्या कुटुंबाकडे घरी परतला. घरच्यांनी त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करत तो परत घरी येण्याची आशा सोडून दिली होती. नरसिंग वयाच्या १७ व्या वर्षी कामासाठी पिथौरागढ जिल्ह्यात गेला होता. हा व्यक्ति घरी परतल्यावर आधी कुटुंबातील सदस्यांनी त्याला ओळखले नाही. मात्र, त्याने जुन्या गोष्टी आणि स्वत:ची ओळख पटवून दिल्यावर त्यांना त्याची ओळख पटली.

नरसिंग रौतके मूळचा नेपाळचा

नरसिंग रौतके हा मूळचा नेपाळचा आहे. त्याच्या बाबत माहिती देतांना त्याच्या घराशेजारील असलेले सुरेंद्र कुमार यांनी सांगितले की, नेपाळच्या झुलाघाट येथील बरेच मजूर. विशेषत: पुरचुनिहाट परिसरात राहणारे पिथौरागढला नोकरी व रोजगाराच्या शोधात येत असतात. मात्र, यातील अनेक मजूर हे बेपत्ता झाले आहेत. या बद्दल अनेक तक्रारी देखील नोंदवल्या गेल्या आहेत.

नरसिंग रौतकेसह हा १७ वर्षांचा असतांना त्याच्या काही सहकारी मित्रांसोबत कामासाठी पिथौरागढला आला होता. मात्र, तो बेपत्ता झाला होता. पिथौरागढ आणि उत्तराखंडच्या इतर भागांमध्ये त्याच्या घरच्यांनी नरसिंगचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. अखेरीस त्याच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यू झाला असावा असे वाटले. त्यांनी त्याचे प्रतीकात्मक अंत्यसंस्कारही देखील केले. काही दिवसांपूर्वी नरसिंग असल्याचा दावा करणारा एक माणूस नेपाळमधील त्याच्या गावापासून ५० किलोमीटर अंतरावर फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

नरसिंगचा पुतण्या गामी सिंग रौतके याने एका वृत्त पत्राला दिलेल्या माहितीनुसार त्याने जारी त्याच्या बेपत्ता काकांना कधीही पाहिले नसले तरी त्याने त्याच्या वडिलांकडून नरसिंगबद्दल बरीच माहिती ऐकली होती. फिरत असलेल्या व्यक्तीची माहिती आणि त्याच्या काकाची माहिती मिळती जुळती असल्याने त्याने काही नातेवाईकांसह फिरणाऱ्या त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे ठरवले. जेव्हा सर्व कुटुंबीय त्या व्यक्तीला भेटले तेव्हा त्यांना धक्का बसला. गावात फिरणारा तो व्यक्ति म्हणजे ६४ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला नरसिंग होता. नरसिंगला जेव्हा त्याचे कुटुंबीय भेटले तेव्हा त्याची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं आढळून आलं. मात्र, तो अचानक घरी परतल्यानं घरच्यांना मोठा धक्का बसला आहे, असे त्याच्या पुतण्याने सांगितले.