Man Playing With crocodile: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल, याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती चक्क जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक असलेल्या किंग कोब्राशी प्राळीव प्राण्याप्रमाणे खेळताना दिसला. यानंतर आता एका व्यक्तीचा मगरीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तो निवांत झोपलेल्या मगरीला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
एखाद्या व्यक्तीला जंगली प्राणी दिसला की, तो आपली वाट बदलतो. जंगली प्राणी कधी कोणावर हल्ला करतील? हे सांगता येत नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क झोपलेल्या मगरीजवळ जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. मगरीच्या हल्ल्यापासून बचावण्यासाठी त्याने अंगावर मगरीचा पोशाख घातल्याचे दिसत आहे. मगर एवढी गाढ झोपेत असते की ती उठत नाही. खूप प्रयत्नानंतर ती उठते पण शांतपणे नदीकडे जाते. परंतु, असे करणे एखाद्या जीवावर बेतू शकते. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
lifequotessuccess या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. चार दिवसांपूर्वी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला जवळपास २५ हजार लोकांनी लाईक्स केले आहे. तर, हजारो लोकांनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, भाऊ, स्वत:हून यमराजकडे गेला. दुसऱ्या वापरकर्त्याने या व्हिडिओबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करत अशी प्रतिक्रिया दिली की, मला वाटते हा व्हिडिओ एडीट केलेला असावा आणि ही मगर देखील खरी नाही. अनेकजण व्हिडीओ पाहून घाबरले आहेत. तर, काही जणांनी जीवाशी खेळून असे व्हिडीओ न बनविण्याचा सल्ला दिला आहे.
काही तासांपूर्वी एका धावत्या ट्रेनमध्ये विषारी साप दिसल्याची घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी गरीब रथ एक्सप्रेस १२१८७ मध्ये अचानक विषारी साप दिसला. ही ट्रेन सायंकाळी ७.५० वाजता जबलपूरहून मुंबई शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात होती. मात्र, भुसावळ ते कसारा स्थानकादरम्यान ट्रेनच्या एससी कोच जी १७ मध्ये २३ च्या वरच्या सीटच्या बाजूला ५ फूट लांब साप लटकलेला दिसल्याने प्रवाशांमध्ये खळबळ माजली. याबाबत माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी घटनस्थळी दाखल झाले.ही प्रवाशांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आणि सोशल मीडियावर व्हायरल केली.‘साप बाहेर आल्याची घटना समोर आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कसारा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. रेल्वे कर्मचारी नियमितपणे बोगी साफ केली जाते’, असे पश्चिम मध्य रेल्वे झोनचे सीपीआरओ हर्षित श्रीवास्तव यांनी सांगितले.