वैद्यकीय क्षेत्रात काही दुर्मिळ असे आहेत की, जे ऐकून लोकांना धक्का बसला. असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक असा आजार समोर आला आहे, ज्यामध्ये पुरुषाचे लिंग हाडात बदलत असते. होय, डॉक्टरदेखील या दुर्मिळ वैद्यकीय स्थितीबद्दल आश्चर्यचकित आहेत. खरं तर ६० वर्षीय व्यक्ती त्याच्या जमिनीवर पडला. त्यानंतर त्याचे गुडघे दुखू लागले. ही समस्या घेऊन तो व्यक्ती डॉक्टरांकडे गेला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर या दुर्मिळ अवस्थेची माहिती मिळाली. रुग्णाच्या लिंगाचे हाडांमध्ये रूपांतर होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. वैद्यकीय भाषेमध्ये याला पेनाइल ओसिफिकेशन म्हणून ओळखले जाते.
पेनाइल ओसिफिकेशनमुळे हाड प्रायव्हेट पार्टमध्ये बाहेर येते. या आजारात शरीराच्या मऊ भागांमध्ये कॅल्शियम जमा होऊ लागते, ज्यामुळे अतिरिक्त हाडे बाहेर पडतात. अशा वेळी रुग्णाला अनेकदा वेदना जाणवत नाहीत. हा रोग आघात किंवा संधिवाताशी संबंधित असू शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा लिंगाच्या मऊ ऊतींमध्ये कॅल्शियम जमा होते तेव्हा ही समस्या उद्भवते. यामुळे पुढे पुरुषाचे लिंग हाडांच्या एक्स्ट्रास्केलेटल रचनेचे रूप धारण करते.
रिपोर्टनुसार, या प्रकरणात डॉक्टरांनी रुग्णाला लिंगाशी संबंधित समस्या सांगितल्यावर तो रुग्णालयातून निघून गेला. तसेच पुढील तपास व उपचारास नकार दिला. लाइव्ह सायन्सनुसार या आजारात आराम मिळवण्यासाठी इंजेक्शन किंवा पेनकिलरचा वापर केला जातो. शॉक-वेव्ह थेरपीद्वारे लिंगातील कॅल्सीफिकेशनचा उपचार केला जातो. ४० ते ७० वयोगटातील लोकांना या समस्येचा धोका अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या आजाराला बळी पडू शकते.
संबंधित बातम्या