मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: रस्त्यावर रील बनवणं पडलं महागात; सोनसाखळी चोरट्यानं तिचं मंगळसूत्र पळवलं!

Viral Video: रस्त्यावर रील बनवणं पडलं महागात; सोनसाखळी चोरट्यानं तिचं मंगळसूत्र पळवलं!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 25, 2024 04:04 PM IST

Chain Snatching Viral Video: रस्त्यात रील बनवणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरून नेणाऱ्या चोरट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोनसाखळी चोरट्यानं रस्यावर रील बनवणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरून नेले.
सोनसाखळी चोरट्यानं रस्यावर रील बनवणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरून नेले.

Chain Snatching News: सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे रील बनवून व्हायरल करीत आहेत. मात्र, काहीवेळा रील तयार करणे अनेकांच्या अंगलट आल्याचे निदर्शनास आले आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका महिलेला रस्त्यात रिल बनणे महागात पडले आहे. रिल बनवताना संबंधित महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र सोनसाखळी चोरट्याने खेचून नेले. हा सर्वप्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी चिंताजनक प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला रस्त्यावर रिल बनवताना चालत आहे. त्यानंतर काही क्षणातच तिच्या विरुद्ध दिशेने दुचाकीवरून आलेला सोनसाखळी चोरटा तिच्या गळ्यातील मंगळसुत्र ओढून नेतो. त्यानंतर महिला जोरात ओरडते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Viral Video: जाता- येता चेष्टा करायची म्हणून दिवसाढवळ्या तरुणीला चाकूनं भोकसलं; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

काँग्रेस कार्यकर्त्याने या घटनेचा व्हिडिओ शेअर करत सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला आहे. गाझियाबादमध्ये रील बनवताना भरदिवसा महिलेचे मंगळसुत्र चोरून गुन्हेगार फरार झाले. देशाच्या गृहमंत्र्यांनी हा व्हिडीओ पाहावा आणि प्रत्येक बाबतीत अपयशी ठरलेले आपले मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याकडे राजीनाम्याची मागणी करावी. महिला रात्री १२ वाजता दागिने घालून घराच्या बाहेर पडू शकतात, गृह मंत्री यांचे हे विधान कितपत खरे आहे, हे तुम्हाला समजेल.” असेही संबंधित कार्यकर्त्याने म्हटले आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग