Viral News: सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी नवीन पाहायला मिळते. असाच एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओ एक तरुण चक्क पाच मुलींशी लग्न करताना दिसत आहे. या लग्नाचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आपल्या भुवया उंचावल्या आहेत. आता या लग्नाशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
इन्स्टाग्राम, फेसबूक आणि युट्यूब व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लग्नाचा मंडप बांधण्यात आल्याचे दिसत आहे. या मंडपात एका नवरदेवासोबत ५ वधू बसलेल्या दिसत आहेत. यावरून नवरदेव एकाच वेळी पाच मुलींशी लग्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.मात्र, या व्हिडिओ मागील सत्य समोर आले आहे.
हा व्हिडिओ ब्रजेश नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. ब्रजेशचे सोशल मीडियावर अभिनेता ब्रजेशच्या नावाने खाते आहे. ब्रजेशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या बायोमध्ये लिहिले आहे की, तो मनोरंजनासाठी हे व्हिडिओ बनवतो. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक व्हिडिओ आहेत, ज्यात तो अभिनय करताना दिसत आहे. हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला असता अभिनेता ब्रजेशच्या नावाचा वॉटरमार्क दिसत आहे. या व्हिडिओमागचे सत्य जाणून घेण्यासाठी त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी केली असता त्याने याआधीही असे अनेक व्हिडिओ बनवल्याचे दिसून आले. यात लग्नाचा व्हिडिओ ९ आठवड्यांपूर्वी शेअर करण्यात आला होत. केवळ मनोरंजनासाठी त्याने पाच मुलींसोबत लग्न केल्याचा व्हिडिओ बनवला आहे.
याआधी राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात दोन सख्ख्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न केल्याची घटना उघडकीस आली होती. या आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्यात कुटुंब, मित्रपरिवार यांच्यासह समाजातील सर्व लोक उपस्थित होते. परंतु, या तरुणाने एकाच मंडपात दोन सख्ख्या बहिणींशी लग्न का केले? यामागचे कारण ऐकूण सगळेच हैराण झाले. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील उनियारा येथे राहणाऱ्या बाबू लाल मीना यांची मोठी मुलगी कांता हिचे एका तरुणाशी लग्न होणार होते. मात्र, लग्नाआधी कांताने अशी अट घातली, ज्यामुळे हरिओम मीना आणि त्यांचे कुटुंबीय चक्रावले.कांताची धाकटी बहीण सुमन ही स्पेशल चाइल्ड आहे. कांता आणि सुमन यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. मोठी बहीण असल्याने कांता सुमनची काळजी घेते. लग्नानंतर तिचं काय होईल? हा विचार करून कांताने नवरदेवासमोर तिच्यासह सुमन हिच्यासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. नवरदेवाने त्या दोघांशी लग्न करून त्यांना सुखी ठेवण्याचे वचन दिले. यासाठी दोन्ही कुटुंबीयांनीही संमती दिली.