Viral News: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल? याचा काही नेम नाही. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती चक्क मृतदेहाशेजारी बसून रील बनवत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, अनेक लोक मृतदेहाशेजारी बसलेले दिसत आहे. काही वेळाने तिथे एक व्यक्ती येतो आणि आपला फोन कोणला तरी देऊन 'तू चला जायेगा तो मैं क्या करूंगा' या गाण्यावर व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सांगतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होताच संबंधित तरुण रडायचे नाटक करतो. कधी तो मृत व्यक्तीच्या तोंडाकडे पाहत आहे. तर, कधी मृतदेहाचे पाय धरताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना एका युजरने असे म्हटले आहे की, 'एखाद्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातून जाणे, हे वैयक्तिक नुकसान आहे आणि त्याचे दु:खही वैयक्तिक आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले आहे की,'हा व्यक्ती मानसिकदृष्ट्या अपंग आहे, आपण काय करतोय? याचा भान असायला हवा.' तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, 'ही फक्त रील नाही, हा एक मानसिक आजार आहे, जो वेगाने पसरत आहे. या व्हिडिओत दुःखापेक्षा दिखावाच जास्त आहे.' तर, एका युजरने असे म्हटले आहे की,'या व्हिडिओत झोपलेला व्यक्ती मृत असल्याचे नाटक करत असल्याचे दिसत आहे. कदाचित रील बनवण्यासाठी असा प्रकार सुरू आहे.'
पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबरच्या रात्री पोलीस कर्मचारी गस्तीवर होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाची कार वेगाने जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्याला अडवले. कारच्या नंबर प्लेटवर भाजप पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्याचा बोर्ड होता. पोलिसांनी चालकाकडे कागदपत्रे मागितली असता त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर पोलिसांनी कारमधून जाणाऱ्या दोन्ही तरुणांना लालपूर पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर आरोपींनी गोंधळ घातला आणि टेबलावर ठेवलेली कागपत्रे फाडून टाकली. यादरम्यान, त्यांनी पोलिसावरही हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी कोणत्याही राजकीय पक्षाचे नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बनावट पद्धतीने एका राजकीय पक्षाचा फलक लावून दोघेही रांची शहरात फिरत होते.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.