मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: एका व्यक्तीनं मगरीच्या पिल्लाचं घेतलं चुंबन; पुढं जे घडलं ते भयानक, पाहा व्हिडिओ

Viral Video: एका व्यक्तीनं मगरीच्या पिल्लाचं घेतलं चुंबन; पुढं जे घडलं ते भयानक, पाहा व्हिडिओ

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 17, 2024 08:24 PM IST

Man Kisses Baby Alligator: मगरीच्या पिल्लाचे चुंबन घेतल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

The image shows a man kissing an alligator.
The image shows a man kissing an alligator. (Instagram/@lounatic11)

Alligator Viral Video: साप किंवा कोळीसारख्या धोकादायक प्राण्यांना किस करतानाचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. मात्र, असे व्हिडिओ अनेकांच्या जीवावर बेतल्याचे आपण पाहिले आहे. यातच एका व्यक्तीने मगरीचे किस घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

इन्स्टाग्राम युजर लुई रामिरेझने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या क्लिपमध्ये एक व्यक्ती हातात मगरीचे पिल्लू घेऊन कॅमेऱ्याकडे पाहत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो त्याला किस करतो. मात्र, त्यावेळी मगरीच्या पिल्लाने संबंधित व्यक्तीच्या नाकाला चावा घेतला. या घटनेत संबंधित व्यक्तीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.

Viral Video: फ्री स्नॅक्सपासून नॅपिंग रूमपर्यंत, पाहा मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांना आणखी कोणते भत्ते मिळतात

हा व्हिडिओ ३० जानेवारी रोजी पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून, व्हिडिओने जवळजवळ ८.७ दशलक्ष व्ह्यूज मिळाले  आहेत. ही संख्या अजूनही वाढत आहे. या शेअरवर लोकांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत. एका इन्स्टाग्राम युजरने लिहिले की, असे धोकादायक स्टंट जीवावर बेतू शकतो.  दुसऱ्याने म्हटले आहे की, मगरीच्या पिल्लाने त्याला परत किस केले. हा व्हिडिओ पाहून मोठा धक्का बसला.

IPL_Entry_Point

विभाग