tamil nadu chennai crime news : तामिळनाडूतील चेन्नईमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने १ कोटी रुपयांच्या विम्याच्या रकमेसाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. एवढेच नाही तर यासाठी आपल्या जवळच्या मित्राचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून आरोपी आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे.
सुरेश हरिकृष्णन असे आरोपीचे नाव आहे. दिलीबाबू असे खून झालेल्या मित्रांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अयनावरम येथील रहिवासी सुरेश हरिकृष्णन याने तब्बल १ कोटी रुपयांचा जीवन विमा उतरवला होता. त्याला ही रक्कम मिळवायची होती. यासाठी त्याने स्वत: च्या मृत्यूचा बनाव रचला. या साठी त्याने त्याच्या दोन मित्रांची मदत घेतली. दरम्यान, स्वत: च्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी सुरेशला त्याच्या सारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीची गरज होती. त्याला ठार मारून तो त्याच्या मृत्यूचा बनाव रचणार होता. त्याच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीची तिघेही शोध घेत होते. दरम्यान, त्यांना त्यांचा मित्र दिलीबाबूची आठवण झाली. दोघेही १० वर्षांपासून मित्र होते. दिलीबाबू देखील अयनावरम येथे राहणारा होता. सुरेशने दिल्लीबाबू आणि त्यांच्या आईशी मैत्री केली. त्यांच्याशी जवळीक वाढवली. १३ सप्टेंबरला आरोपी सुरेश दोघांना घेऊन दारू देण्यासाठी पुद्दुचेरीला घेऊन गेला.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी दिलीबाबूला चेंगलपट्टूजवळील एका मोकळ्या मैदानात नेले. त्या ठिकाणी असलेल्या एका शेतातील झोपडीत ते थांबले. दरम्यान, १५ सप्टेंबरच्या रात्री सुरेशने दारूच्या नशेत दिलीबाबूचा गळा आवळून झोपडी पेटवून दिली. यानंतर तिघे घटनास्थळावरून पळून गेले. सुरेश फरार झाल्यावर त्याचा या घटनेत मृत्यू झाला असा बनवा रचण्यात आला. सुरेश असल्याचे समजून दिली बाबू यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार क अरण्यात आले.
दरम्यान, दिल्लीबाबूंची आई लीलावती यांनी मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती. कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. १६ सप्टेंबर रोजी एका जळालेल्या झोपडीत जळालेला मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चौकशी केली असता त्या व्यक्तीचे नाव सुरेश असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मृतदेह त्याच्या बहिणीने नेला आणि अंतिम संस्कार देखील झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र, ज्या दिवशी सुरेशसोबत तिचा मुलगा बेपत्ता झाला, त्यादिवशी लीलावती यांनी पोलिसांना दिलीबाबू बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. तसेच दोघेही सोबत बाहेर गेल्याचे देखील तपासात पुढे आले. पोलिसांचा संशय बळावला. पोलिस थेट सुरेशच्या गावी गेले, तिथे तो मृत झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
दिल्लीबाबूच्या मृत्यूच्या मृत्यूप्रकरणी सुरेश जबाबदार असल्याचा पोलिसांचा संशय वाढला. पोलिसांनी दोघांचे मोबाईल ट्रेस केले आणि त्यांच्या फोनचे सिग्नल जळालेल्या झोपडीजवळ सक्रिय असल्याचे आढळले. दारम्यान पोलिसांनी आरोपीच्या दोन मित्रांचा शोध घेतला. यावेळी त्यांनी सुरेश जिवंत असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी सुरेशला त्याच्या मित्रासह अटक केली. सुरेश आणि कीर्ती राजन यांनी दिलीबाबूच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना अटक करून सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.