मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: नदीकाठी मृतदेह तरंगताना पाहून पोलीस धावले, हात लावताच सगळे झाले शॉक!

Viral Video: नदीकाठी मृतदेह तरंगताना पाहून पोलीस धावले, हात लावताच सगळे झाले शॉक!

Jun 12, 2024 05:12 PM IST

Viral News: उष्णतेपासून वाचण्यासाठी अनेकजण आगळीवेगळी शक्कल लढवत आहेत, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नदीकाठी मृतदेह तरंगताना पाहून परिसरात एकच खळबळ माजली.
नदीकाठी मृतदेह तरंगताना पाहून परिसरात एकच खळबळ माजली.

Funny Video: देशातील अनेक भागात अजूनही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उष्णतेमुळे नागरिकांना अनेक आरोग्या संबंधित समस्या जाणवत आहेत. उष्णतेपासून वाचण्यासाठी आगळीवेगळी शक्कल लढवत आहेत. बहुतेक लोक एसी कूलरचा वापर करत आहेत. तर, काहीजण वाटरपार्कमध्ये वेळ घालवत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी वॉटर पार्क आणि स्वीमिंग पूल नाहीत. सध्या सोशल मीडियावर एका नदीकाठीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे नदीत एक मृतदेह तरंगताना दिसला. हे पाहिल्यानंतर पोलीस अचंबित झाले. हा व्हिडिओ मीडिया चांगलाच व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

व्हायरल व्हिडिओ नदीकाठीचा दिसत आहे. जिथे एक मृतदेह पाण्यात तरंगताना दिसत आहे. हे पाहून स्थानिक लोक आश्चर्यचकीत होतात. याबाबत ते पोलिसांना माहिती देतात. यानंतर घटनास्थळी दाखल झालेले पोलीस नदीत जाऊन तपासणी करतात. मात्र, त्यानंतर पोलिसांसह स्थानिक नागरिकही हैराण होतात. कारण नदीकाठी तरंगणारा मृतदेह नसून जीवंत व्यक्ती असतो. यानंतर नदीत पडलेल्या व्यक्तीने आपण असे पाण्यात का तरंगत आहोत याचा खुलासा केला. त्यामुळे उन्हापासून वाचण्यासाठी आपण हे करत असल्याचे त्याने सांगितले. वास्तव जाणून पोलीस कर्मचारीही हैराण झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर @AAnamika या नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला. या व्हिडिओला आतापर्यंत चार लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, 'पोलीस जिवंतांना मृत आणि मृतांना जिवंत करण्यात व्यस्त आहे.' दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, 'पोलीस आम्हाला आंघोळही करू देत नाहीत.' दुसऱ्या युजरने कमेंट केली की, 'ते तुम्हाला शांतपणे बुडू देत नाहीत.' आणखी एक म्हणतोय की,'इथे कसले लोक राहतात.'

WhatsApp channel
विभाग