मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कॉमेडी शो पाहताना एक व्यक्ती इतका खळखळून हसला की, रुग्णालयात करावे लागले दाखल; डॉक्टरांनी सांगितला आजार

कॉमेडी शो पाहताना एक व्यक्ती इतका खळखळून हसला की, रुग्णालयात करावे लागले दाखल; डॉक्टरांनी सांगितला आजार

Jun 03, 2024 04:28 PM IST

Viral Video : हैदराबाद शहरात एक व्यक्ती कॉमेडी शो पाहताना इतका हसला इतका हसला की बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.

कॉमेडी शो पाहताना व्यक्ती हसून हसून पडला बेशुद्ध
कॉमेडी शो पाहताना व्यक्ती हसून हसून पडला बेशुद्ध

म्हटले जाते की खळखळून हास्य असे औषध आहे, जे सर्व रोगांना पळवून लावते. मात्र प्रमाणापेक्षा अधिक हास्य व सतत हसत राहणे अनेकादा अडचणीत टाकणारं असतं. असेच एक प्रकरण समोर आलं आहे. हैदराबाद शहरात एक व्यक्ती कॉमेडी शो पाहताना इतका हसला इतका हसला की बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. घटना गंमतीशीर असली तरी त्यानंतर जे घडले हे पाहून सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे. डॉक्टरांनी सोशल मीडियावर असे काम करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

हैदराबादमधील अपोलो रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी एक्स वर घटनेशी संबंधित किस्सा शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, ही घटना तेव्हा झाली जेव्हा ५३ वर्षाचा  एक व्यक्ती आपल्या घरात कुटूंबीयांसोबत चहा पीत कॉमेडी शो पाहात होता. डॉक्टरांनी या व्यक्तीचने नाव श्याम असे सांगितले. 

कॉमेडी शो पाहताना हसून-हसून झाला बेशुद्ध - 
डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितले की, मिस्टर श्याम यांना हा शो इतका गंमतीशीर वाटला की, त्यांना आपले हसू आवरले नाही. ते अनेक मिनिटे न थांबता हसत राहिले. त्यानंतर अघटित घडले. श्याम यांच्या हातून चहाचा कप निसटून जमिनीवर पडला. त्यांचे शरीर एका बाजुला झुकले आणि ते खुर्चीवरून खाली पडले. ते जमिनीवर बेशुद्ध होऊन पडल्याचे पाहताच त्यांच्या कुटूंबीयांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. 

डॉक्टरांनी सांगितले आजाराचे नाव - 
डॉक्टरांनी सांगितले की, श्याम बेशुद्ध पडल्यानंतर घाबरलेल्या कुटूंबीयांनी रुग्णवाहिका बोलावली व त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र काही वेळातच त्यांनी आपले डोळे उघडले. ते पूर्णपणे ठीक होते. त्यांच्यावर काही वेळ अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. मेडिकल टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांनी त्यामध्ये काही गडबड दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी पुढील उपचारासाठी डॉ. सुधीर कुमार यांच्याकडे रेफर करण्यात आले. डॉ. कुमार यांना आढळले की, ही एक दुर्मिळ घटना आहे. 

डॉक्टरांनी सांगितले की, मिस्टर श्याम यांचे कोणत्याही मेडिकल आजाराचे रेकॉर्ड नाही. ते कोणतेच औषध घेत नव्हते. त्यांनी रुग्णाला कोणतेही औषध दिले नाही मात्र कार्डियोलॉजी तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर अधिक वेळ न हसणे तसेच अधिक वेळ उभे न राहण्याचा सल्ला दिला. मिस्टर श्याम यांना डॉक्टरांनी शारीरिक कष्टाची कामे न करण्यास सांगितले आहे.

 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग