हिंदू धर्मात पूजा व अन्य धार्मिक कार्यक्रमात नारळ फोडणे खूपच सामान्य गोष्ट आहे. पूजेच्या वेळी देवाला फळे, फुले व मिष्ठान्न अर्पण करण्याबरोबरच नारळही फोडतात. मंदिरात देवाच्या पूजेवेळी एका व्यक्तीला स्टंट करणे चांगलेच अंगलट आले आहे. त्याने पूजा करताना नारळ आपल्या डोक्याने फोडला. मात्र दुसऱ्याच क्षणी तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये एक व्यक्ती डोक्यावर नारळ फोडताना दिसत आहे. नारळ फोडण्याच्या कारनामा केल्यानंतर तो दुसऱ्याच क्षणी बेशुद्ध झाला. व्हिडिओमध्ये दिसते की, एका ठिकाणी पूजा होत आहे. एक व्यक्ती हातात नारळ घेऊन भजन कीर्तन करत आहे. त्यावेळी पुढे येऊन हा व्यक्ती नारळ आपल्या डोक्यावर आपटून फोडतो. एका फटक्यात नारळ फुटतो, मात्र त्यानंतर एक खळबळजनक घटना घडते. व्हिडिओमध्ये दिसते की, त्या व्यक्तीची तब्येत बिघडते आणि काही सेंकदात तो जमिनीवर कोसळतो. त्या व्यक्तीची प्रकृती सध्या कशी आहे, हे समजलेले नाही.
इंटरनेटवर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही तासातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला व लोकांनी या व्यक्तीबद्दल चिंता व्यक्त केली. लोकांमध्ये या गोष्टीवरून वादही पाहायला मिळाला की, आजही देशातून अशा प्रथा संपलेल्या नाहीत. अन्य एक युजरने म्हटले आहे की, अशा विचित्र प्रवृत्ती केवळ भारतातच दिसून येतात.
अन्य एका यूजरने व्यंग्यात्मक टिप्पणी करत म्हटले की,"ऑपरेशन यशस्वी झाले मात्र रुग्णाचा मृत्यू". अन्य एकाने म्हटले आहे की, स्वत:चे बलिदान दिले कारण हा देवाचा पुत्र आहे.