६२ वर्षीय वृद्धाने घेतले कोरोना व्हॅक्सिनचे २१७ डोस, शास्त्रज्ञही झाले थक्क; वाचा पुढं काय झालं
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ६२ वर्षीय वृद्धाने घेतले कोरोना व्हॅक्सिनचे २१७ डोस, शास्त्रज्ञही झाले थक्क; वाचा पुढं काय झालं

६२ वर्षीय वृद्धाने घेतले कोरोना व्हॅक्सिनचे २१७ डोस, शास्त्रज्ञही झाले थक्क; वाचा पुढं काय झालं

Mar 06, 2024 07:29 PM IST

जर्मनीच्यामॅगडेबर्ग शहरात राहणाऱ्या एका ६२वर्षीयवृद्ध व्यक्तीने सर्वांना थक्क करणारा दावा केला आहे

६२ वर्षीय वृद्धाने कोरोना व्हॅक्सिनचे घेतले २१७ डोस
६२ वर्षीय वृद्धाने कोरोना व्हॅक्सिनचे घेतले २१७ डोस

जर्मनीच्या मॅगडेबर्ग शहरात राहणाऱ्या एका ६२ वर्षीय वृद्ध व्यक्तीने सर्वांना थक्क करणारा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, त्याने कोरोना व्हायरस चे २०० हून अधिक व्हॅक्सिनचे डोस घेतले आहेत. वृद्धाच्या दाव्यानं शास्त्रज्ञांची झोप उडाली आहे. त्यानंतर शास्त्रज्ञांनी संबंधित व्यक्तीची माहिती घेऊन त्याच्या इम्यून रिस्पॉन्सचा अभ्यास सुरू केला आहे.

इंस्टीट्यूट ऑफ मायक्रोबायोलॉजी - क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी, इम्यूनोलॉजी अँड हायजीनचे डॉ. किलियन शॉबर यांनी म्हटले की, आम्हाला वृत्तपत्रातील बातम्यांतून हा प्रकार समजला आहे. त्यानंतर आम्ही संबंधित व्यक्तीशी संपर्क करत त्यांना एर्लांगेनमध्ये विविध चाचण्या करण्यास सांगितले आहे. प्रेस रिलीजमधये म्हटले आहे की, जर्मनीतील या व्यक्तीला २९ महिन्यात काही कारणामुळे २१७ लसी देण्यात आल्या आहेत. 

शॉबर यांनी सांगितले की, या व्यक्तीचे रक्ताच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. काही नमूने फ्रीज करून ठेवले आहेत. त्याचबरोबर जेव्हा आणखी एक लस दिली गेली तेव्हा या व्यक्तीचे ब्लड सँपल घेतले गेले. आम्ही हे सँपलच्या आधारे आम्ही परीक्षण करून की, या व्हॅक्सिनेशननंतर त्याचा इम्यून सिस्टम काम कसे करते.

टेस्टिंगनंतर समजले की, टी-इफेक्टर पेशींची संख्या अधिक संख्येने होती, जी कोविड-१९ संक्रमणापासून वाचवते. जेव्हा तीन लसी घेतलेल्या व्यक्तीच्या इम्यून सिस्टमशी तुलना केली गेली, तेव्हा ६२ वर्षीय वृद्धाच्या शरीरात पेशींची संख्या अधिक मिळाली. त्याशिवाय शास्त्रज्ञांना आढळले की, त्याच्या पेशी सक्रीय तसेच मजबूत होत्या. लँसेट इंफेक्शियस डिजीज जर्नलमध्ये प्रकाशित अध्ययन रिपोर्टचे लेखक कॅटरीना कोचर यांनी सांगितले की, आमच्या परीक्षणात मेमोरी पेशींची संख्या अधिक प्रमाणात होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर