आजकाल व्यसनाधीनता व पैसा, जमिनीच्या वादातून आईवडिलांची हत्या करण्याच्या अनेक घटना आजूबाजुला घडताना दिसतात. असाच एक प्रकार आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यात समोर आला आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या आईला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला. आसपासच्या लोकांनी ही घटना पाहिली व पुढील अनर्थ टळला. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गॅब्रियल लाकरा आपल्या आईसोबत रहात असतो चहाच्या मळ्यात काम करतो. गेल्या १० वर्षापासून त्याची आई आजारी असून तिला चालताही येत नाही.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास गॅब्रियल आपली वृद्ध आई बुधनी लाकरा हिला घेऊन घराच्या पाठीमागे जात होता. परिसरातील लोकांनी हे पाहिले व त्यांचा त्याचा संशय आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर लोकांनी त्याच्या घराच्या पाठीमागे जाऊन पाहिले असता त्यांना धक्का बसला. घराच्या पाठीमागे गॅब्रियलने भला मोठा खड्डा खणून ठेवला होता.
गॅब्रियलने आपल्या आईला खड्ड्यात टाकून जवळपास पुरले होते. इतक्यात लोकांनी तेथे जाऊन तिला खड्ड्यातून बाहेर काढले. महिलेचा श्वास सुरू होता. त्यानंतर स्थानिकांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गॅब्रियलने आईला जिवंत पुरण्याच्या प्रयत्न का केला, याची माहिती मिळालेली नाही. मात्र परिसरातील लोकांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून महिलेवर उपचार सुरू होते. आईवर उपचार करून करून गॅब्रियल कंटाळला होता. त्यामुळे काहीही करून त्याला यातून सुटका करून घ्यायची होती. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या आईची प्रकृती नाजूक असून तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.
संबंधित तरुणी सर्वात जास्त जेवायची पैज लावून लोकांचे मनोरंजन करायची. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी दररोज १० किलो जेवायची. जेवणाच्या स्पर्धेत तिने अनेक बक्षीस जिंकले. मात्र, एकदिवस हा प्रयोग तिच्या जीवा बेतेल, याची तिने कधीच कल्पनाही केली नसेल.
संबंधित बातम्या