रेल्वेतून प्रवास करताना सहप्रवाशांशी संपर्क साधणे सामान्य गोष्ट आहे. असाच काहीसा प्रकार आपल्या मुलीसोबत प्रवास करणाऱ्या इन्स्टाग्राम युजर नीलमसोबत घडला. सहप्रवाशांशी संपर्क साधल्यानंतर तिच्या मुलीचे एका वृद्ध व्यक्तीशी चांगलंच बॉन्डिंग झाले नीलमने या दोघांना ट्रेनमध्ये खेळताना आणि मस्ती करतानाचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ शेअर करताना पोस्टमध्ये तिने चिमुकल्यासोबत खेळल्यानंतर त्या व्यक्तीला अश्रू अनावर झाल्याची माहितीही दिली आहे.
तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती लहान मुलीसोबत खेळताना दिसत आहे. एकमेकांशी संवाद साधताना दोघंही हसत असतात. व्हिडिओ शेअर करताना पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने सांगितले की, ती ट्रेनमध्ये वृद्ध जोडप्याला भेटली आणि ती व्यक्ती बिझनेसमन होती. मुलीसोबत खेळल्यानंतर त्या व्यक्तीचे डोळे पाणावले. नीलमच्या म्हणण्यानुसार, नातवंडांना गमावल्यामुळे ती व्यक्ती रडत असावी, असे तिला वाटते.
हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. पोस्ट केल्यापासून त्याला जवळपास २१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या शेअरवर असंख्य लाईक्स आणि कमेंट्सही आहेत. यावर लोकांनी कमेंटही केल्या आहेत. एक व्यक्ती म्हणाली, "आपल्याबद्दल अधिक आदर आहे की, आपण त्याला आपल्या मुलाबरोबर चांगला वेळ घालवू दिला. कदाचित त्याला आपल्या प्रियजनांची आठवण आली असावी.
पूर्वा स्मिता शाह नावाच्या आणखी एका इन्स्टाग्राम युजरने म्हटले आहे की, "लोक अनेकदा विसरतात की, आता त्यांच्या आई-वडिलांना अशाच प्रेमाची आणि आपुलकीची गरज आहे. विशेषत: त्यांच्या बाळांच्या सहवासात. तुमची पोस्ट शेअर केली आहे. आशा आहे की, लोक ही बाब सहानुभूतीने समजून घेतील. इथे मांडल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. खूप प्रेम."
किशोर चौधरी या युजरने लिहिले की, "कदाचित त्याला आपली नात तिच्यात दिसली असावी!"
चौथ्याने पुढे म्हटले की, "तो माणूस आपल्या नातवंडांबरोबर खेळायला मुकत असावा.