Delhi Shocking: दिल्लीत भर रस्त्यात महिलेला मारहाण, त्यानंतर जबरदस्तीनं गाडीत बसवलं, व्हिडिओ व्हायरल
Viral Video: दिल्लीत भर रस्त्यात महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Delhi Viral Video: देशात महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्ली येथून सर्वांना हादरुन टाकणारी माहिती समोर आली. दिल्लीच्या मंगोलपुरी येथे भर रस्त्यात एक व्यक्ती महिलेला मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये बसवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिला मारहाण करताना दिसत आहे. तसेच जबरदस्तीने तिला कारमध्ये बसवत आहे. कारमध्ये बसवल्यानंतरही या व्हिडिओतील व्यक्ती महिलेला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ विष्णू जोशी नावाच्या एका व्यक्तीने शेअर केला आहे. या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्रामच्या रतन विहारमध्ये राहणार्या एका व्यक्तीच्या नावावर ही कार नोंदणीकृत आहे. त्याने ही कार एका फायनान्सरला विकली आहे. विशेष म्हणजे, ही कार आतापर्यंत १०० हून अधिकजणांना विकेले गेल्याची माहिती समोर येत आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर अशा प्रकारची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीत दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचार सुरू आहेत. अशा घटनांमुळे महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विभाग