मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: मुलीला प्रवासादरम्यान शांत झोप लागते म्हणून थेट विमानानं घर गाठलं

Viral News: मुलीला प्रवासादरम्यान शांत झोप लागते म्हणून थेट विमानानं घर गाठलं

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 17, 2024 12:30 PM IST

चिनी नववर्ष साजरे करण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या ७ वर्षांच्या मुलीसह दोन आसनी विमानाने आपले घर गाठले.

two-seater plane (representational image).
two-seater plane (representational image). (Unsplash/@harlimarten)

चीनमध्ये एका व्यक्तीने आपल्या ७ वर्षांच्या मुलीसह आपल्या गावी जाण्यासाठी भन्नाट मार्ग निवडला. मुलीला घरी नेण्यासाठी संबंधित व्यक्तीने दोन आसनी विमानाने घरापर्यंत प्रवास केला. याबाबत त्याला प्रश्न विचारले असता तो म्हणाले की, "या प्रवासादरम्यान वाहतूक कोंडीसारख्या त्रासापासून सुटका होते. तसेच मुलीली प्रवासादरम्यान शांत झोप लागते."

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, वांग असे या व्यक्तीचे नाव आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून सण आणि सुट्टीच्या दिवशी आपल्या दोन आसनी विमानाने आपल्या मुलीला घरी घेऊन जात आहे. वैमानिकांचे प्रशिक्षक असलेले वांग हे पूर्व चीनच्या अनहुई प्रांतातील रहिवासी आहेत.

वांग यांनी आउटलेटला सांगितले की, “रस्त्याने आपल्या मूळ गावी पोहोचण्यासाठी सुमारे तीन तास लागतात. मात्र, विमानाने प्रवास करताना हा वेळ ५० मिनिटांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. तसेच त्यांच्या मुलीला प्रवासादरम्यान शांत झोप लागते.”

या प्रवासासाठी वांग यांना काही तास अगोदर या मार्गाचा वापर करण्यासाठी अर्ज करावा लागतो. आपल्या मूळ गावी आई- वडिलांच्या घराजवळ असलेल्या फ्लाइंग कॅम्पमध्ये पार्किंग करण्याची परवानगी ही त्याला घ्यावी लागते. वांग यांनी सांगितले आहे की, त्यांच्या छोट्या विमानाची किंमत सुमारे १.१ दशलक्ष युआन म्हणजेच १ लाख ५५ हजार अमेरिकन डॉर्लर्स इतकी आहे. या विमानाची फ्यूल टँक फूल केल्यावर तो सुमारे १२०० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतो.

एससीएमपीने दिलेल्या वृत्तानुसार, ही बातमी लवकरच चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डौयिनपर्यंत पोहोचली. आउटलेटच्या म्हणण्यानुसार, काही लोकांनी वांग यांच्या वाहतुकीच्या निवडीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग