Uttar Pradesh Divorce News: उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी माहिती समोर आली. एका साडीमुळे पत्नी-पत्नीचे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले. पत्नी आवडची साडी नेसत नाही म्हणून संबंधित व्यक्तीने लग्नाच्या आठ महिन्यातच तिच्यापासून विभिक्त होण्याचा निर्णय घेतला. किरकोळ कारणांवरून नेहमीच्या त्रासाला वैतागून पत्नीही माहेरी निघून गेली. आता हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचले आहे. जिथे गेल्या रविवारी दोघांचे समुपदेशन करण्यात आले.
आग्रा जिल्ह्यातील तरुणीचे लग्न हाथरस जिल्ह्यातील एका तरुणाशी झाले. दोघांचे ८ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. या दोघांचे लग्न हिंदू रितीरिवाजांनुसार मोठ्या थाटामाटात झाले. पतीने कौटुंबिक समुपदेशन केंद्रात सांगितले की, त्याचे पत्नीवर खूप प्रेम आहे. परंतु, त्याची पत्नी त्याला आवडत असलेली साडी नेसत नाही. पत्नीला या साडीत पाहून तो खूप खूश होतो.
दुसरीकडे, पत्नीने आपली बाजू मांडताना सांगितले की, ज्यावेळी ती स्वत:च्या आवडीची साडी नेसते, तेव्हा तिचा पती नाराज होतो. याच मुद्द्यावरून गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यात मोठा वाद झाला आणि ती माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यानंतर महिलेने पतीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे वर्ग केले. हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्रात आल्यानंतर समुपदेशक डॉ.अमित गौड यांनी दोघांचेही समुपदेशन केले.
डॉ.अमित गौड म्हणाले की, "एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पत्नीने आपल्या आवडीची साडी नेसावी, अशी नवऱ्याची इच्छा आहे. या प्रकरणातील पुरुष मानसिक आजारी आहे, किंवा त्याचे पत्नीवर खूप प्रेम आहे. दोघांचेही मत जाणून घेण्यात आले आहेत. दोघांची समजूत काढण्यात आली."
संबंधित बातम्या