Viral Video : जिममध्ये ट्रेड मिलवर धावताना अचानक कोसळला तरुण; जागीच मृत्यू, समोर आला भयावह व्हिडिओ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : जिममध्ये ट्रेड मिलवर धावताना अचानक कोसळला तरुण; जागीच मृत्यू, समोर आला भयावह व्हिडिओ

Viral Video : जिममध्ये ट्रेड मिलवर धावताना अचानक कोसळला तरुण; जागीच मृत्यू, समोर आला भयावह व्हिडिओ

Aug 02, 2024 07:09 PM IST

Viral Video : जिममध्ये ट्रेड मिलवर धावण्याचा व्यायाम करताना विमा एजेंट असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या अचानक झालेल्या मृत्यूच्या घटनेच्या खळबळ माजली आहे.

जिममध्ये ट्रेड मिलवर धावताना अचानक कोसळला तरुण; जागीच मृत्यू
जिममध्ये ट्रेड मिलवर धावताना अचानक कोसळला तरुण; जागीच मृत्यू

जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गाजियाबादमधील वेव सिटी पोलीस ठाणे क्षेत्रातही अशीच एक हृदयद्रावर घटना समोर आली आहे. येथे एका जिममध्ये ट्रेड मिलवर धावण्याचा व्यायाम करताना विमा एजेंट असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या अचानक झालेल्या मृत्यूच्या घटनेच्या खळबळ माजली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी सांगितले की, घटना जिममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे, मात्र पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येऊ शकते.

जलेंद्र सिंह (वय ४२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते वेव सिटी पोलीस ठाणे क्षेत्रातील महरौली येथील पीआर एनक्लेवमध्ये राहाणारे पत्नी व मुलीसोबत राहत होते. ते खासगी विमा कंपनीत एजेंट म्हणून काम करत होते. जलेंद्र सिंह रोजच्या प्रमाणे शुक्रवारी पहाटे महरौली अंडरपासजवळच्या एमके फिटनेस जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेले होते.

ट्रेड मिलवर (trade mill) धावताना अचानक ते जमिनीवर कोसळले. या घटनेने जिममध्ये खळबळ माजली. जिम मालक कपिल तसेच महरौली येथील निवासी अमित यांनी त्यांना तत्काळ जवळच्या मणिपाल रुग्णालयात हलवले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच वेव सिटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात हा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसीपी वेव सिटी पूनम मिश्रा यांनी सांगितले की, जिममध्ये लावलेल्या सीसीटीवी कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

एसीपी वेव सिटी यांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये जलेंद्र ट्रेड मिलवर धावताना दिसत आहेत. अचानक ते आपला एक हाथ छातीवर ठेवतात. त्यानंतर त्यांची धावण्याची गती कमी होते. थोड्या वेळाने ते धावणे बंद करून ट्रेड मिलवर उभे राहतात. काही सेकंदातच ते जमिनीवर कोसळतात. जलेंद्र जमिनीवर कोसळल्याचे पाहून त्यांच्या जवळ व्यायाम करणारे तरुण त्याच्या छातीवर पंपिंग करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर तेथे जिम मालकही पोहोचतो. दोघे खूप वेळ प्रयत्न करतात मात्र त्यांना शुद्ध येत नाही.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर