गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्याच्या नादात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. तरुण सिंहाच्या पिंजऱ्यात शिरला, पण सिंहांना ते अजिबात आवडले नाही. सिंहांनी हल्ला करून त्या व्यक्तीला ठार मारले. उज्बेकिस्तानमधील एका खासगी प्राणीसंग्रहालयात एकाचा भयानक मृत्यू झाला आहे. ४४ वर्षीय एफ. इरिसकुलोव यांनी आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्याच्या नादात अशी स्टंटबाजी केली की, त्याला आपला जीव गमवावा लागला.
रिपोर्टनुसार इरिसकुलोव यांनी नाइट शिफ्टवेळी सकाळी ५ वाजता सिंहांच्या पिंजऱ्याचा टाळा खोलला. तो पिंजऱ्यात जाऊन सिंहांचा व्हिडिओ रेकॉर्ड करू लागला, हा व्हिडिओ तो आपल्या प्रेयसीला पाठवणार होता.
त्या व्यक्तीचे भयानक शेवटचे क्षण त्याच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. उझबेकिस्तानमधील पार्कंट येथील एका खासगी प्राणिसंग्रहालयात कीपर म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीला आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करायचे होते. त्यामुळे तो सिंहांसोबत व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी त्यांच्या पिंजऱ्यात शिरला होता.
व्हिडिओमध्ये प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी असलेल्या इरिसकुलोव याच्या किंकाळ्या व सिंहाच्या हल्ल्याचे आवाज स्पष्ट ऐकू येतात. सिंहांनी त्याला ठार मारले व आपली शिकार बनवले. हा व्हिडिओ इतका बीभत्स आहे की, तो सार्वजनिक करता येत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार , प्राणिसंग्रहालयात काम करणारे ४४ वर्षीय एफ. इरिस्कुलोव्ह पहाटे ५ च्या सुमारास सिंहाच्या पिंजऱ्याजवळ जाऊन तेथील कुलूप उघडताना दिसत आहेत. कुलूप उघडून तो आत जातो आणि शांतपणे तिथे बसलेल्या सिंहांपर्यंत पोहोचतो.
व्हिडिओच्या सुरुवातीला सिंह त्याच्याकडे फार शांतपणे पाहतात. तरुण सिंहाच्या अंगावरून हात फिरवायला सुरूवात करतो. एक सिंह त्याच्यावर हल्ला करणार असतो, तेव्हा तो सिंहाला सिम्बा म्हणून संबोधतो आणि त्याला शांत होण्यास सांगतो, ज्यावर सिंह मागे हटतो. पण त्याचवेळी दुसरा सिंह त्याच्यावर हल्ला करतो. तो मोठ्याने ओरडतो आणि सिंहांना शांत होण्यास सांगतो परंतु सिंह त्याची मान पकडून त्याला जखमी करतो. सिंहाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू होतो. संपूर्ण घटनेदरम्यान त्याचा कॅमेरा चालू असतो, यामुळे संपूर्ण घटना त्यात कैद झाली आहे.
स्थानिक पोलिसांनी एक निवेदन जारी करून घटनेची माहिती दिली होती. १७ डिसेंबरच्या रात्री एकाच पिंजऱ्यातील तीन सिंह पिंजऱ्याच्या बाहेर आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्यावर एकाने हल्ला केला. या हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
संबंधित बातम्या