जे लोक साध्या झुरळाला घाबरतात त्यांच्यासमोर जर अचानक साप आला तर काय होईल?त्यांचा भीतीने थरकाप उडेल.मात्र काही लोक असेही आहेत, जे साप पाळण्याचा छंद ठेवतात. ते कोठेही गेले तरी आपल्यासोबत साप घेऊन जातात. मात्र असे केल्याने अन्य लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती अजगर घेऊन मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, हा व्यक्ती अजगरला आपल्या मांडीवर घेऊन बसला आहे. साप हळू हळू त्या व्यक्तीच्या शरीरावर चढत आहे. दरम्यान अन्य प्रवाशांनी सापाकडे लक्ष दिले नाही. मात्र एक महिला प्रवाशी हे दृष्य पाहून चांगलीच हादरली आहे. ती यामुळे घाबरली आहे की, साप तिच्यावर हल्ला करेल. यावेळी तिने आपली पापणीही हलवली नाही. मात्रहिन्दुस्तान टाईम्स मराठी या व्हिडिओची पुष्टि करत नाही.
हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही लोकांनी म्हटले की, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये असला खतरनाक जीव घेऊन जाणे बेकायदेशीर आहे. एका यूजरने म्हटले की, असे लोक स्वत:चा जीव धोक्यात घालतातच मात्र आपल्या वर्तनामुळे दुसऱ्यालाही त्रास देतात.अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले की, महिला प्रवाशाला सोडून अन्य कोणीही सापाकडे बिल्कूल लक्ष दिले नाही. काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की, इतक्या मोठ्या सापासोबत कोणी कसे काय प्रवास करू शकतात. या व्हिडिओला दोन कोटीहून अधिक ह्व्यूज मिळाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेले युगांग ग्रोटोज येथे प्राधिकरणाने महिलांच्या शौचालयात टायमर लावले आहे. टॉयलेटमध्ये टायमर लावल्याचा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा शांक्सी प्रांतातील दातोंग शहरात बौद्ध पर्यटन स्थळावर आलेल्या एका पर्यटकाने याचे चित्रिकरण केले व याचा व्हिडिओ एका सरकारी स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयात पाठवला. या व्हिडिओत दिसते की, प्रत्येक टॉयलेटच्या बाहेर एक डिजिटल टायमर लावले आहे.