Viral Video : स्कूटी ६० हजारांची आणि हेल्मेट सव्वा लाखांचा; दुचाकीस्वाराचा व्हिडिओ व्हायरल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : स्कूटी ६० हजारांची आणि हेल्मेट सव्वा लाखांचा; दुचाकीस्वाराचा व्हिडिओ व्हायरल!

Viral Video : स्कूटी ६० हजारांची आणि हेल्मेट सव्वा लाखांचा; दुचाकीस्वाराचा व्हिडिओ व्हायरल!

Nov 05, 2024 03:55 PM IST

Man Wearing Helmet Price of 1.29 Lack: सव्वा लाखांचे हेल्मेट घालून रस्त्यावर दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 व्हायरल व्हिडिओ: ६० हजारांची स्कूटी अन् हेल्मेट १.२९ लाखांचा
व्हायरल व्हिडिओ: ६० हजारांची स्कूटी अन् हेल्मेट १.२९ लाखांचा

Viral News: सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती त्याच्या स्कूटर आणि हेल्मेटमुळे चर्चेत आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती आपल्या स्कूटरने जात असताना त्याच्या पाठीमागील दुचाकीस्वार त्याचा व्हिडिओ बनवत आहे. काही वेळाने व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीची दुचाकी स्कूटरला ओव्हरटेक करते. मात्र, त्यानंतर कॅमेऱ्यात जे कैद होते, ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. कारण स्कूटरवरून तरुणाच्या डोक्यात चक्क सव्वा लाख रुपये किंमतीचे हेल्मेट दिसते.

व्हिडिओमध्ये पुढे दाखवण्यात आले आहे की, स्कूटरची ऑन-ग्राउंड किंमत ६० हजार रुपये आहे. पण त्याने घातलेल्या हेल्मेटची किंमत १ लाख २९ हजार रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे हेल्मेट AGV PISTA GP R Project 46 3.0 Carbon हेल्मेट आहे, ज्याची किंमत ऑनलाइन तपासू शकता. Adult Society या नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला २.९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. तर, ८५ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे. या व्हिडिओवर एक हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, 'त्याचे हेल्मेट या संपूर्ण माणसापेक्षा महाग आहे.' दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'त्याने हे हेल्मेट त्याच्या काकांकडून चोरले आहे.' तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'त्याचे हेल्मेट त्याच्या स्कूटरपेक्षा महाग आहे.' आणखी एका युजरने लिहिले आहे की, 'हे डुप्लिकेट हेल्मेट आहे.'

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर