Girls Hostel Viral Video : आजकाल कॉलेज विद्यार्थी चॅँलेंज किंवा डेरिंगच्या नावावर काही ना काही करामती करत असतात. कोणी उंच इमारतीवरून उडी मारण्याचे चँलेज देतो तर कोणी मुलीच्या हॉस्टेलमध्ये लपून-छपून जाऊन तेथून सुरक्षित बाहेर येण्याचे चँलेज स्वीकरतो. मात्र असे विचित्र प्रकार करण्यापूर्वी ही बातमी जरुर वाचा.
गर्ल्स हॉस्टेलमध्ये जाण्यासाठी एक तरुणांने भन्नाट शक्कल लढवून मुलींच्या वसतीगृहात शिरला. मात्र आत जाताच त्याला सुरक्षा रक्षकांनी पकडले. लपून-छपून मुलींच्या हॉस्टेलमध्ये घुसल्यानंतर तरुणाचे जे हाल झाले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्लेटफॉर्म एक्स वर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, एका बिल्डिंगच्या आत अनेक लोक जमा झाले आहेत. त्यावेळी एक महिला एका व्यक्तीला काठीने मारताना दिसते. सर्व लोक त्या व्यक्तीला ओरडत असतात. काही वेळानंतर एक पुरूष येतो व त्याच काठीने त्या व्यक्तीला मारू लागतो.
यावेळी तो व्यक्ती त्याला काही प्रश्न विचारतो मात्र त्याचा आवाज स्पष्ट एकू येत नाही. १ मिनिट ४३ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये लोक या व्यक्तीला मारताना दिसत आहेत.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘एका व्यक्तीने मुलीचे रुप घेऊन तो मुलींच्या वसतीगृहात घुसला. मात्र आत गेल्यावर पकडला गेला. त्या मुलाचे व कॉलेजच्या अधिकाऱ्यांमध्ये हा क्लेश होत आहे. आतापर्यंत २ लाख७३हजार लोकांनी पाहिला आहे.