मैत्रिणीसोबत मद्यधुंद अवस्थेत येणाऱ्या पतीचा रस्त्यातच मृत्यू, आता पत्नीने प्रेयसीकडे मागितली नुकसानभरपाई
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मैत्रिणीसोबत मद्यधुंद अवस्थेत येणाऱ्या पतीचा रस्त्यातच मृत्यू, आता पत्नीने प्रेयसीकडे मागितली नुकसानभरपाई

मैत्रिणीसोबत मद्यधुंद अवस्थेत येणाऱ्या पतीचा रस्त्यातच मृत्यू, आता पत्नीने प्रेयसीकडे मागितली नुकसानभरपाई

Jan 07, 2025 11:49 PM IST

चीनमध्ये एक व्यक्ती आपल्या मैत्रिणीसोबत मद्यपान करून आणि जेवण करून घरी परतत होता. गाडीतून पडून वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आता पत्नीने पतीच्या मैत्रिणीकडे ७० लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे.

प्रेयसीसोबत येताना पतीचा मृत्यू
प्रेयसीसोबत येताना पतीचा मृत्यू

चीनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती दारूच्या नशेत तर्र होऊन आणि प्रेयसीसोबत जेवण करून घरी परतत होता. सीट बेल्ट न लावल्याने चालत्या कारमधून पडून त्याचा मृत्यू झाला. आता पत्नीने पतीच्या मैत्रिणीकडे ७० लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे. पत्नीने सांगितले की, तिला पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल माहिती नाही कारण जर पतीचा मृत्यू परस्त्रीच्या कारमधून पडून झाला तर तिला नुकसान भरपाई द्यावी लागेल. महिलेच्या प्रकरणात पोलिसांत तक्रार आल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. न्यायालयाच्या आदेशानुसार महिलेला नुकसान भरपाई द्यावी लागली.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २०२२ मध्ये घडली होती. वांग नावाच्या एका विवाहित व्यक्तीची लियू नावाच्या महिलेशी भेट झाली आणि त्यांनी विवाहबाह्य संबंध सुरू केले. जुलै २९२३ मध्ये वांग आणि लियू यांच्यात संबंध संपवण्यावरून वाद झाला होता. दोघांनी एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केले आणि मद्यधुंद अवस्थेत कारमधून प्रवास करत होते. लियू गाडी चालवत होती. वांग कारमध्ये तिच्या शेजारी बसला होता मद्यधुंद अवस्थेत होता. वांग सीटबेल्ट न लावता बसला होता. प्रवासादरम्यान तो चालत्या कारमधून खाली पडला.

घाबरलेल्या लियू यांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला रुग्णालयात दाखल केले, परंतु मेंदूला जबर दुखापत झाल्यामुळे २४ तासांनंतर उपचारादरम्यान वांग यांचा मृत्यू झाला. पोलिस तपासात वांग सीटबेल्ट न घातल्यामुळे खाली पडल्याचे दिसून आले आणि लियू दोषी आढळली नाही. मात्र, वांग यांच्या पत्नीने आपल्या दिवंगत पतीच्या प्रेयसीकडे सहा लाख युआन (सुमारे ७० लाख ३६ हजार रुपये) नुकसान भरपाईची मागणी केली.

जेव्हा हे प्रकरण न्यायालयात पोहोचले तेव्हा न्यायाधीशांनी पत्नीचा संपूर्ण पैशांवरील दावा फेटाळून लावला परंतु लियू यांना ६५,००० युआन (सुमारे ८ लाख रुपये) देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने वांग यांच्या मृत्यूसाठी लियू यांना जबाबदार धरले नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर