मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक! किरकोळ वादातून पतीने पत्नीचे शीर केले धडावेगळे, नंतर किचनमध्ये बसून शरीराचे केले तुकडे-तुकडे

धक्कादायक! किरकोळ वादातून पतीने पत्नीचे शीर केले धडावेगळे, नंतर किचनमध्ये बसून शरीराचे केले तुकडे-तुकडे

May 28, 2024 04:40 PM IST

Karnataka News : भांडणानंतर पतीने पुष्पाचे शीर कापून धडावेगळे केले. त्यानंतर मृतदेह किचनमध्ये ओढत नेऊन तिच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे केले. ही घटना तुमकुरु जिल्ह्यातील होस्पेट गावात घडली.

किरकोळ वादातून पतीने पत्नीचे शीर केले धडावेगळे (सांकेतिक छायाचित्र)
किरकोळ वादातून पतीने पत्नीचे शीर केले धडावेगळे (सांकेतिक छायाचित्र)

कर्नाटक राज्यातील तुमकुरु जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तिने आपल्या पत्नीची हत्या केली व त्यानंतर मृतदेहाचे तुकडे-तुकडे केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मीडियाने ही माहिती दिली आहे. ही घटना तुमकुरू जिल्ह्यातील होस्पेट गावात घडली.

ट्रेंडिंग न्यूज

पुष्पा (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी पतीचे नाव शिवराम असे आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री पत्नीशी झालेल्या वादातून शिवरामने तिची हत्या केली व शरीराचे तुकडे-तुकडे केले.

पोलिसांनी सांगितले की, भांडणानंतर पतीने पुष्पाचे शीर कापून धडावेगळे केले. त्यानंतर मृतदेह किचनमध्ये ओढत नेऊन तिच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे केले. पुष्पा कर्नाटक राज्यातील शिवमोगा जिल्ह्यातील सागरा शहरात रहात होती. हे दाम्पत्य आपल्या ८ वर्षाच्या मुलासह भाड्याच्या घरात होते.

आरोपी पती एक आरा मशीनवर हेल्पर म्हणून काम करत होता. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात समोर आले आहे की, या दाम्पत्यामध्ये नेहमी वाद होत होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.

दरम्यान एप्रिल महिन्यात कर्नाटकच्या हुबळी येथे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या नेहा हिरेमठ या मुलीचा तिच्याच मित्राने महाविद्यालयात दिवसाढवळ्या खून केला होता. नेहा हिरेमठ ही २३ वर्षीय तरुणी हुबळीच्या बीव्हीबी महाविद्यालयात मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स (MCA) चे शिक्षण घेत होती. 

तिच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या तिच्या मित्राने फयाजने नेहावर चाकूने वार करत हत्या केली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही हत्या कैद झाली होती. आरोपीने नेहाचा पाठलाग करून तिच्यावर सपासप वार केल्यामुळे नेहाचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान नेहाच्या वडिलांना त्याला आपल्या मुलीचा पाठलाग न करण्याचा इशारा दिला होता. या हत्या प्रकरणावरून कर्नाटकमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. लोकसभेच्या प्रचारातही हा मुद्दा चांगलात तापला होता.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग