जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जाणारा महाकुंभ मेळा दीर्घकाळापासून अध्यात्म आणि भक्तीचे प्रतीक आहे. मात्र, ४५ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे अनेकांनी येथे येणाऱ्या पर्यटकांच्या नैतिक दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक चेंजिंग रुममध्ये एक व्यक्ती लघवी करताना पकडण्यात आला. याचा व्हिडिओ व्हाय़रल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून या व्यक्तीच्या कृत्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दिव्या गंदोत्रा टंडन यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक त्या व्यक्तीला आक्रमक पद्धतीने सामोरे जाताना दिसत आहेत आणि तो वारंवार माफी मागत आहे. तो माणूस अस्वस्थ दिसत असला, तरी बहाणे देत आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण होते. क्लिपमध्ये ऐकल्याप्रमाणे टॉयलेटची सुविधा चेंजिंग रूमपासून फार दूर नव्हती, ही बाब अनेकांना आश्चर्यचकित आणि निराश करणारी आहे. यामुळे त्या व्यक्तीच्या मूलभूत सभ्यतेच्या अभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेचे ठिकाण आणि तारीख HT मराठी . com यांनी स्पष्ट केली नसली तरी हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आणि काल शेअर केल्यापासून २,३५,००० व्ह्यूज मिळाले आहेत.
या घटनेवर जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकजण या व्यक्तीवर कारवाईची मागणी करत आहेत. धार्मिक मूल्यांचे प्रतिबिंब उमटविणाऱ्या ठिकाणी असे कृत्य कसे होऊ शकते, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. ही क्लिप सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली असून असंख्य युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.
एका युजरने म्हटले की, "विशेषत: महाकुंभासारख्या पवित्र ठिकाणी हे अस्वीकार्य वर्तन आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. आणखी एकाने कमेंट केली की, "कोणी इतके असंवेदनशील कसे असू शकते? बेसिक सिव्हिल सेन्सचं काय झालं?" एका तिसऱ्या युजरने लिहिले की, "अशा घटनांमुळे उत्सवाची प्रतिष्ठा मलीन होत आहे आणि आम्ही याला शिक्षा झाल्याशिवाय शांत राहू देऊ शकत नाही." अनेकांनी अशाच भावना व्यक्त करत कुंभमेळ्याच्या पावित्र्याविषयी दाखविलेल्या अनादराकडे लक्ष वेधले आणि मेळाव्याची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याची मागणी केली.
संबंधित बातम्या