Viral News: बहुतेक लोक सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या घरात गुप्त कॅमेरे बसवतात. अनेक वेळा अशा कॅमेऱ्यांमध्ये अविश्वसनीय गोष्टी कैद होतात, ज्याची आपण कधीच कल्पना करू शकत नाही. अशीच एक घटना एका व्यक्तीसोबत घडली. या व्यक्तीने आपल्या घरात सुरक्षतेसाठी गुप्त कॅमेरे लावले. मात्र, एकदा सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना त्याला मोठा धक्का बसला. तो ऑफिसला गेल्यानंतर त्याची पत्नी अनेक पुरुषांना घरी बोलवून घ्यायची, असे त्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले.
@picturesFoIder नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'कामावर गेल्यानंतर पतीने घरात बसलेल्या गुप्त कॅमेऱ्यामध्ये सर्व काही पाहिले.' या व्हिडिओला आतापर्यंत ३० लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तर, हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही जण संताप व्यक्त केला जात आहे. नवऱ्याच्या अनुपस्थितीत इतर पुरुषांना घरी बोलावणे चुकीचे असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले आहे की, 'अशा महिला नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात.' दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, 'नवऱ्याने अशा महिलेसोबत कसे आपले आयुष्य जगायचे.' तिसऱ्याने लिहिले आहे की, 'फसवणूक करणाऱ्या महिलेसोबत जगणे खूप कठीण आहे. या गोष्टींमुळे अनेकांचे आयुष्य उद्धस्त होते.' आणखी एका युजरने म्हटले आहे की, 'या महिलेचा पती तिला खरेच माफ करेल का?'
संबंधित बातम्या