Viral News : भर विमानात तूफान हाणामारी! प्रवाशाने तोडला सहप्रवाशाचा दात; विमान लँड होताच आरोपीला बेड्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : भर विमानात तूफान हाणामारी! प्रवाशाने तोडला सहप्रवाशाचा दात; विमान लँड होताच आरोपीला बेड्या

Viral News : भर विमानात तूफान हाणामारी! प्रवाशाने तोडला सहप्रवाशाचा दात; विमान लँड होताच आरोपीला बेड्या

Nov 03, 2024 09:31 AM IST

Viral News : सॅन फ्रान्सिस्कोहून व्हर्जिनियाला जाणाऱ्या विमानात एका व्यक्तीने सहप्रवाशावर हल्ला केला. यात प्रवाशी गंभीर जखमी झाला. आरोपीला कोठडी सुनावण्यात आली आहे.

भर विमानात तूफान हाणामारी! प्रवाशाने तोडला सहप्रवाशाचा दात; विमान लँड होताच आरोपीला बेड्या
भर विमानात तूफान हाणामारी! प्रवाशाने तोडला सहप्रवाशाचा दात; विमान लँड होताच आरोपीला बेड्या

Viral News : विमानातील प्रवासादरम्यान एका व्यक्तीने आपल्या सहप्रवाशावर किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला केला.  शेजारी बसलेली व्यक्ती आपल्या सीटवर झोपली होती. यावेळी  शेजारच्या प्रवाशाने त्याच्यावर हल्ला केला. ही घटना अमेरिकेतील अलेक्झांड्रिया येथील आहे. एफबीआय एजंटच्या म्हणण्यानुसार, एव्हरेट चॅड नेल्सन नावाच्या व्यक्तीने सहप्रवाशाच्या चेहऱ्यावर अनेक वार केले. त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त वाहू लागलं. तर त्याचा दात तोडला.  यानंतर इतर प्रवाशांनी आरोपीला पकडून बाहेर काढलं.

सॅन फ्रान्सिस्कोहून व्हर्जिनियाला जाणाऱ्या युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात सोमवारी ही घटना घडली. युनायटेडने एका निवेदनात म्हटले आहे की, एका प्रवाशावर झालेल्या हल्ल्यानंतर क्रू आणि प्रवाशांनी दिलेल्या तात्काळ प्रतीसादाबद्दल आम्ही आभारी आहोत. विमान उतरल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं तर पीडित जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मारहाणीचं कारण अस्पष्ट ? 

युनायटेडने दिलेल्या माहितीनुसार, विमानात ८२  प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, नेल्सन मागच्या सीटवर बसले होते. त्याने टॉयलेटचा वापर केला आणि नंतर बाहेर येताच सहप्रवाशाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या अपघातात प्रवाशाच्या डोळ्याजवळ आणि नाकाला जखमा झाल्या आहेत तसेच त्याचा दात तुटला.  नेस्लिनच्या स्लीव्हवरही रक्त होते. एजंटने सांगितले की, आरोपी पीडितेला आधीपासून ओळखतही नव्हता. हल्ल्याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

आरोपी नेल्सनला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला कोर्टासमोर हजर केले असताना त्याला कोठडी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.  या प्रकरणी ११ डिसेंबररोजी सुनावणी होणार आहे. मॅजिस्ट्रेटने नेल्सनबद्दल सर्व माहिती मागितली आहे. अमेरिकेत वर्षभरात अशा १७०० हून अधिक मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर