मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mass Suicide: जन्मदात्या पित्यानं पोटच्या ३ मुलांसह रेल्वेसमोर उडी घेत आयुष्य संपवले!

Mass Suicide: जन्मदात्या पित्यानं पोटच्या ३ मुलांसह रेल्वेसमोर उडी घेत आयुष्य संपवले!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 01, 2024 01:21 PM IST

Family of 4 Dies by Suicide: गुजरातच्या बोटाड जिल्ह्यात एकाच कुटुंबियांतील चौघांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली.

Gujarat Suicide
Gujarat Suicide

Gujarat Botad Mass Suicide: गुजरातच्या बोटाड जिल्ह्यात रविवारी एका ४२ वर्षीय एका व्यक्तीने त्याच्या दोन मुली आणि मुलाने रेल्वेसमोर उडी मारून आयुष्य संपवले. पोलिसांनी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. या कुटुंबाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.

रेल्वे संरक्षण दलाचे उपनिरीक्षक व्ही.एस.गोलेने सांगितले की, ही घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. भावनगरहून गांधीधामला जात असताना चौघांनी पॅसेंजर ट्रेनसमोर उडी मारली. या चौघांचे मृतदेह रेल्वे रुळावर सापडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगाभाई विजुडा (वय, ४२) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो बोटाड जिल्ह्याच्या गधाडा तालुक्यातील नाना साखरपार गावचा रहिवासी आहे. नातेवाईकाशी झालेल्या भांडणानंतर खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली त्याला अटक झाली होती. तो जामिनावर बाहेर होता. सोनम (वय, १७) आणि रेखा (वय, २१) आणि जिग्नेश (वय, १९) अशी विजुडाच्या मुलींची नावे आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास सुरू आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

पालघर: रस्ता अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

पालघरमध्ये एसटी बस आणि डंपरची धडकेत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, २० प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जानेवारी दुपारी पालघर जिल्ह्यातील मनोर-विक्रमगड मार्गावर घडली.

WhatsApp channel

विभाग