पाकिस्तानमध्ये एका विवाह समारंभात डान्स परफॉर्मेंसचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. यामध्ये पुरुषांचा एक समूह एकसारख्या आउटफिटमध्ये लोकप्रिय बॉलीवूड गीत छैया छैया (Chaiyya Chaiyya) वर डान्स करताना दिसत आहेत.
व्हिडिओच्या सुरुवातीला मोकळ्या वातावरणात एक सजवलेला मंच दिसतो. सर्व डान्सर्संनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. ते लोकप्रिय गाणे छैया-छैयावर सामूहिक नृत्य करताना दिसतात. सर्वांनी चांगल्या डान्स स्टेप्स केल्या मात्र समोर डान्स करत असलेल्या एका व्यक्तीने केलेल्या डान्सचे सर्वांनी कौतुक केले.
हा व्हिडिओ १० फेब्रुवारी रोजी पोस्ट केला होता. आतापर्यंत ही क्लिप ७.६ मिलियनहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. अजूनही या संख्येत वाढ होत आहे. तरुणांच्या एनर्जीचे नेटीझन्सनी कौतुक केले आहे.
एका इंस्टाग्राम यूजरने पोस्ट केला की, या व्यक्तीची आयडी सांगितली पाहिजे जो व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दूसऱ्याने लिहिले की, तो इतका चांगला आहे की, मी दुसऱ्यांकडे पाहिलेही नाही. तिसऱ्याने लिहिले की, मध्ये डान्स करणाऱ्याच्या एनर्जीपुढे अन्य सर्वजण अदृश्य आहे.
दिल से चित्रपटातील 'छैया छैया' गाणे शाहरुख खान आणि मलायका अरोडा यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गुलज़ार यांनी लिहिलेले गाणे सुखविंदर सिंह आणि सपना अवस्थी यांनी गायले होते. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या गाण्याला एआर रहमान यांनी संगीतबद्ध केलं होते.
संबंधित बातम्या