मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Congress President: काँग्रेस अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत, मल्लिकार्जुन खर्गे शर्यतीत
मल्लिकार्जुन खर्गे
मल्लिकार्जुन खर्गे (PTI)

Congress President: काँग्रेस अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत, मल्लिकार्जुन खर्गे शर्यतीत

30 September 2022, 9:58 ISTSuraj Sadashiv Yadav

Congress President: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कांग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आऊट झाल्यानंतर दिग्विजय सिंह आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी एन्ट्री केली आहे.

Congress President: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अशोक गेहलोत यांनी माघार घेतल्यानंतर आता रंगत वाढत चालली आहे. शशी थरूर आणि दिग्विजय सिंह यांच्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे हेसुद्धा काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत. यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. मल्लिकार्जुन खर्गे आज त्यांचा अर्ज दाखल करणार आहेत. याआधी दिग्विजय सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मल्लिकार्जुन खर्गे हे आज दुपारी साडे बाराच्या सुमारास अर्ज दाखल करतील. दिग्विजय सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतल्यानं आता आणखी चर्चा सुरू आहेत. सोनिया गांधी यांनी सांगितल्यास दिग्विजय सिंह हे त्यांचा अर्ज मागे घेऊ शकतात असंही म्हटलं जात आहे.

दिग्विजय सिंह आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात काय चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. दिग्विजय सिंह यांनी अर्ज केल्यानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटलं होतं की, आम्ही मित्रांप्रमाणे पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढत आहे. शत्रूसारखी नाही. चांगली गोष्ट ही आहे की पक्षाच्या निवडणुकीत एकापेक्षा जास्त उमेदवार आहेत.