Maldives India News : मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत व मालदीवमधील संबंधात कटुता आली आहे. मोदी यांनी लक्षद्वीप हे सुंदर ठिकाण असून भारतीयांनी परदेशात जाण्याएवजी भरतात यावे असे आवाहन देखील केले होते. यामुळे मालदिवचे पित्त खवळले होते. मोईज्जू सरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. या नंतर सोशल मिडियावर भारतीयांनी संताप व्यक्त केला होता. बॉयकॉट मालदिव हा ट्रेंड देखील काल दिवसभर सुरू होता. याचा परिमाण म्हणून अनेक पर्यटकांनी मालदिव टूर रद्द केले. यामुळे मालदिव सरकारला जाग आली. यानंतर मोदी यांच्यावर टीका करणारे मरियम शिउना, मलशा शरीफ आणि अब्दुल्ला महजूम मजीद या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच लक्षद्वीपला भेट होती. ‘लँड ऑफ कोरल्स’ अशी लक्षद्वीपची ख्याती आहे. मोदी यांच्या भेटीनंतर भारताचा सुंदर समुद्रकिनारा लक्षद्वीप चर्चेत आला आहे. या बाबत मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती, स्नॉर्कलिंग केल्यावर मोदी हे पांढऱ्या वाळूवर चालताना आणि समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती घेतानाचे फोटो देखील त्यांनी शेअर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा आहे. लक्षद्वीपचे सौंदर्य पाहून अनेकजण आता तिथे जाण्याचा विचार करत आहेत. सोशल मिडियावर अनेकांनी लक्षद्वीपची तुलना थेट मालदिवशी केली. मोदी यांनी येथे भेट देऊन देशातील पर्यटन वाढीसाठी आवाहंन देखील केले. यानंतर लक्षद्वीप हे सर्वाधिक चर्चेत राहिले.
लक्षद्वीपची वाढती चर्चा आणि लोकप्रियता मालदीव मंत्री मंडळातील तीन खासदारांना चांगलीच खुपली. मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी पीएम मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आणि भारत सरकार लक्षद्वीपला मालदीवचे पर्यायी पर्यटन स्थळ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप केला.
मालदीवचे खासदार जाहिद रमीझ यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना एक भ्रम आहे. झाहिद रमीझ यांनी ट्विटरवर वादग्रस्त कमेंट केली की, "भारतीय हॉटेलच्या खोल्यांमधील उग्र वास हा भारतासाठी सर्वात मोठी पडझड असेल". यानंतर लक्षद्वीपबाबत केलेल्या या वादग्रस्त टिप्पणीबद्दल एका भारतीय ट्विटर युजर्सनी मालदीवच्या या खासदारांना फटकारलं. मालदीवच्या युवा मंत्रालयात, उपमंत्री मरियम शिउना, मलशा शरीफ आणि अब्दुल्ला महजूम मजीद यांनी पीएम मोदींबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणी नंतर बॉलीवूड मधील अनेक कलाकार, मोठी मंडळी आणि अनेक नागरीक सोशल मिडियावर व्यक्त झाले. भारतीयांनी सोशल मीडियावर मालदिव विरोधात संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले. मालदीवला जाण्याऐवजी देशांतर्गत पर्यटन स्थळांना भेट देण्याचे आवाहन नागरीक करत होते. तर अनेक भारतीयांनी काही वेळातच त्यांचा नियोजित मालदिव दौरा रद्द देखील केला.
दरम्यान, रविवारी वाढत्या विरोधाननत्र माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी मालदीव सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करत निषेध व्यक्त केला. यानंतर पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या मरियम शिउना, मलशा शरीफ आणि महजूम मजीद या तीन मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र, मालदीवचे एक मंत्री हसन जिहान यांनी या वृत्ताचे खंडन केले.
संबंधित बातम्या