India Maldiv row : भारत आणि मालदिव यांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहे. चीन दौऱ्यानंतर मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू यांनी भरताविरोधी भूमिका तीव्र केली आहे. आता याचा फटका मालदिवच्या सर्वसामान्य नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. मालदिव येथील एका १४ वर्षांच्या मुलाला ब्रेन स्ट्रोक आला होता. या मुलावर तातडीने उपचार करण्यासाठी एअरलिफ्ट करणे गरजेचे होते. या साठी भारताने एयर अॅम्ब्युलेन्स देखील उपलब्ध करून दिली होती. मात्र, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांनी परवानगी न दिल्याने हे विमान भारतात येऊ शकले नाही. यामुळे या निष्पाप मुलाचा जीव गेला. या संदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
मालदीवमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाला पक्षाघाताचा झटका आला. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर बनली. परिणामी त्याला त्याच्या गाफ अलिफ विलिंगिली या त्याच्या निवासस्थानातून राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सची गरज होती. भारताने डॉर्नियर विमानातून या मुलाला एअरलिफ्ट करण्याची तयारी दर्शवली. मात्र, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी याला मंजुरी देण्यास नकार दिला. यामुळे या मुलाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. या मुलाला ब्रेन ट्यूमर होता आणि त्याला पक्षाघाताचा झटका आला होता. मुलाची प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घरातून राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्स मिळवली अशी मागणी केली होती. या मुलाला तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी एयर अॅम्ब्युलेन्सची व्यवस्था अधिकारी करू शकले नाहीत, असा आरोप कुटुंबीयांनी केला.
या मुलाच्या वडिलांचे वक्तव्य मालदीवच्या मीडियामध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यात म्हटले आहे की, 'मुलाला पक्षाघाताचा झटका आल्यानंतर लगेचच आम्ही त्याला माले येथे नेण्यासाठी आयलँड एव्हिएशनला कॉल केला. परंतु त्यांनी आमच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता आमच्या फोनला त्यांनी उत्तर दिले. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, त्याला तात्काळ माले येथे नेन्यासाठी विमानाची मागणी केल्यावर १६ तासांनी त्याला माले येथे आणण्यात आले. मात्र, उशीर झाल्याने डॉक्टर माझ्या मुलाला वाचवू शकले नाहीत. हे एअर लिफ्ट करण्याकरता राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे मुलाला जीव गमावावा लागला आहे, असंही अनेक माध्यमांनी वृत्त दिलं आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत आसंधा लिमिटेड कंपनीने त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, इमर्जन्सी इव्हॅक्युएशनचे आवाहन करण्यात आल्यावर आम्ही लगेच प्रक्रिया सुरू केली. पण, दुर्दैवाने, विमान उड्डाणात तांत्रिक समस्येमुळे हे उड्डाण रद्द करावे लागले. अशा परिस्थितीत नियोजनानुसार कामे होऊ शकली नाहीत. भारत आणि मालदीवमधील संबंधांमध्ये तणाव असताना मुलाच्या मृत्यूची बातमी आली आहे. खरं तर, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती, त्याबद्दल मालदीवच्या काही मंत्र्यांनी तयांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. यानंतर दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.