मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  mohamed muizzu : भारता विरोधात भूमिका घेणाऱ्या मुइझू यांची खुर्ची धोक्यात, महाभियोग दाखल होणार

mohamed muizzu : भारता विरोधात भूमिका घेणाऱ्या मुइझू यांची खुर्ची धोक्यात, महाभियोग दाखल होणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 30, 2024 02:07 PM IST

maldives president mohamed muizzu : मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे सध्या अडचणीत आले आहेत. मालदीवमधील विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रेटिंक पार्टीने (एमडीपी) मुइज्जू सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे.

 Maldives President Mohamed Muizzu
Maldives President Mohamed Muizzu (AP)

maldives president mohamed muizzu : मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची खुर्ची सध्या धोक्यात आली आहे. मुइज्जु यांना सत्तेवरून हटवण्याची विरोधक एकवटले आहेत. मालदीवमधील विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रेटिंक पार्टीने (एमडीपी) मुइज्जू सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे. एमडीपी मालदीवच्या संसदेत बहुमत असलेला प्रमुख विरोधी पक्ष आहे. सत्ताधारी युती प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (पीपीएम) आणि पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) या अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्यासाठी तयारी करत आहेत.

भारतीय नौदलाची मोठी कामगिरी! समुद्री चाच्यांच्या तावडीतून केली १९ पाकिस्तानी नागरिकांसह इराणच्या जहाजाची सुटका

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळात चार मंत्र्यांची नेमणूक करण्यासाठी रविवारी (२८ जानेवारी) संसदेत मतदान घेण्यात आले. परंतु, विरोधी पक्षाने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये मोठा राडा झाला. संसदेत झालेल्या मारहाणीत काही जण जखमी देखील झाले.

सत्ताधारी आघाडीने दावा केला की, संसदेत बहुमत असलेल्या एमडीपीने कितीही प्रयत्न केले तरी महाभियोग कोणत्याही प्रकारे लागू होऊ दिला जाणार नाही. राष्ट्रपती मुइझू यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भारताशी चांगले संबंध असलेले माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला होता.

Hemant Soren : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरातून ३६ लाखांची रोकड, बीएमडब्लू कार जप्त

एमडीपीने, डेमोक्रॅट्सच्या पक्षासोबत महाभियोग प्रस्तावासाठी खासदारांच्या पुरेशा स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत. यानंतर हा प्रस्थाव संसदेत दाखल केला जाणार आहे. 'द एडिशन.एमव्ही'च्या वृत्तानुसार, सोमवारी झालेल्या एमडीपीच्या संसदीय गटाच्या बैठकीत महाभियोग प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. संसदेच्या स्थायी आदेशासह संविधानात असे म्हटले आहे की राष्ट्रपतींवर ५६ मतांनी महाभियोग चालविला जाऊ शकतो.

मालदीवमध्ये पीपल्स नॅशनल काँग्रेस व प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव हे दोन पक्ष सत्तेत आहेत. तर माजी अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी हा पक्ष विरोधात आहे. विरोधात असलेल्या पक्षाचे मालदीवच्या संसदेत सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त खासदार आहेत. मालदीवच्या संसदेत एकूण ८० सदस्य आहेत. मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे (एमडीपी) ४५ सदस्य आहेत तर सहयोगी पक्ष 'द डेमोक्रॅट्स' चे १३ सदस्य आहेत. सत्ताधारी युतीमध्ये मालदीवच्या प्रोग्रेसिव्ह पार्टीचे दोन सदस्य आणि पीपल्स नॅशनल काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. तीन अपक्ष सदस्य आहेत, तर जमहूरी पक्ष आणि मालदीव डेव्हलपमेंट अलायन्स (एमडीए) यांचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत.

राष्ट्रपतींविरुद्ध महाभियोग प्रस्तावासाठी स्वाक्षऱ्या गोळा करण्यापूर्वी पीपीएम-पीएनसी युतीने सभापती मोहम्मद अस्लम आणि उपसभापती अहमद सलीम यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. दोघेही एमडीपी पक्षाचे आहेत. बातमीनुसार, सोमवारी आदल्या दिवशी संसदेने गृहनिर्माण मंत्री अली हैदर अहमद, इस्लामिक मंत्री मोहम्मद शाहीम अली सईद आणि ॲटर्नी जनरल अहमद उशाम यांना मंजुरी नाकारण्यासाठी मतदान केले, तर अर्थमंत्री मोहम्मद सईद या प्रक्रियेत थोडक्यात बचावले.

एमडीपी आणि डेमोक्रॅट्स संसदीय गटाने रविवारच्या मतदानापूर्वी अध्यक्ष मुइझ्झू यांच्या मंत्रिमंडळाच्या चार सदस्यांना संसदीय मंजुरी रोखण्याचा निर्णय घेतल्यानंतर मालदीवच्या सत्ताधारी प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि पीपल्स नॅशनल काँग्रेस (PPM) युतीच्या सरकार समर्थक खासदारांनी संसदीय सभागृहात हाणामारी केली होती. यात दोन खासदार जखमी झाले होते.

WhatsApp channel

विभाग