Maldives association of tourism industry : मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत व मालदीवमधील संबंधात कटुता आली आहे. मोईज्जू सरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने सोशल मिडियावर भारतीयांनी संताप व्यक्त केला. यानंतर बॉयकॉट मालदिव हा ट्रेंड देखील सुरू केला आहे. याचा गंभीर परिमाण मालदिवच्या पर्यटणावर होतांना दिसत आहे. मालदिव सरकारने तिन्ही मंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. त्यानंतरही वाद कमी होत नसल्याने आता मालदीव असोसिएशन ऑफ टूरिझम इंडस्ट्रीने मोदी यांच्या अवमानाबद्दल माफी मागितली आहे. या बाबबत त्यांनी सोशल मीडिया साईट 'X' वर पोस्ट देखील केली आहे. या संदर्भात एएनआयने वृत्त दिले आहे.
मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत व मालदीवमधील संबंधात कटुता आली आहे. मोदी यांनी लक्षद्वीप हे सुंदर ठिकाण असून भारतीयांनी परदेशात जाण्याएवजी भरतात यावे असे आवाहन देखील केले होते. यामुळे मालदिवच्या मोईज्जू सरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. या नंतर सोशल मिडियावर भारतीयांनी संताप व्यक्त केला होता. बॉयकॉट मालदिव हा ट्रेंड देखील दिवसभर सुरू होता. याचा परिमाण म्हणून अनेक पर्यटकांनी मालदिव टूर रद्द केले. तर अनेक भारतीय पर्यटन कंपन्यांनी मालदिवची विमान उड्डाणे देखील रद्द केली. यानंतर मालविद सरकारने मरियम शिउना, मलशा शरीफ आणि अब्दुल्ला महजूम मजीद या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. यानंतर आता मालदीव असोसिएशन ऑफ टूरिझम इंडस्ट्रीने भारताची माफी मागीतली आहे.
मालदीव असोसिएशन ऑफ टूरिझम इंडस्ट्री (MATI)ने सोशल मीडिया साईट 'X' वर पोस्ट केली आहे. यात मालदिवच्या काही उपमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोदी यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक व्यक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी ज्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिकांची माफी मागितली आहे. मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्रीने या बाबतचे पत्र ट्विटर पोस्ट केले आहे.
मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्रीने पत्र लिहीत भारतीयांची माफी मागितली आहे. भारत हा आपला सर्वात जवळचा शेजारी आणि मित्र देश आहे. भारताने नेहमीच विविध संकटात मालदिवची मदत केली आहे. सरकारने तसेच भारतातील लोकांनी आपल्याशी जपलेल्या घनिष्ठ संबंधाबद्दल आम्ही आभारी आहोत.
मालदीवच्या पर्यटन उद्योगात भारताचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. एक चांगला शेजारी असल्याने भारताने कोरोना काळात देखील मालदिवला भरीव मदत केली. कोरोना नंतर भारत मालदीवसाठी एक प्रमुख बाजारपेठ ठरली आहे. दोन्ही देशातील संबंध पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादाई असून ते टिकून राहावे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे अशा व्यक्तव्याचा आम्ही निषेध करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट देत त्यांच्या या भेतीबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लक्षद्वीपमध्ये पर्यटन करण्यासाठी यावे असे आवाहन नागरिकांना केले होते. यानंतर लक्षद्वीप हे सर्वाधिक चर्चेत राहिले. अनेक भारतीयांनी मालदिवचा दौरा रद्द करत लक्षद्वीपला जाणे पसंत केले आहे.