मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नाईट क्लबमध्ये भीषण अग्निकांड; २९ जणांचा होरपळून मृत्यू अनेक गंभीर

नाईट क्लबमध्ये भीषण अग्निकांड; २९ जणांचा होरपळून मृत्यू अनेक गंभीर

Apr 03, 2024 12:00 AM IST

Istanbul Night Club Fire : इस्तंबूलमधील एका नाईट क्लबमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे नुतनीकरणाचे काम सुरू असताना लागलेल्या आगीत कमीत कमी २९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

 इस्तंबूलमधील नाईट क्लबमध्ये भीषण आग
इस्तंबूलमधील नाईट क्लबमध्ये भीषण आग

तुर्कीमधील सर्वात मोठे शहर इस्तंबूलमधील एका नाईट क्लबमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे नुतनीकरणाचे काम सुरू असताना लागलेल्या आगीत कमीत कमी २९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक जण गंभाररित्या भाजले आहेत. याप्रकरणी क्लबच्या व्यवस्थापकासह पाच लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार गवर्नर ऑफिसकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार एकाच व्यक्तीवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मासक्वेरादे नाईट क्लब गेल्या अनेक दिवसांपासून बंद होता. इमारतीत रेनोव्हेशनचे काम केले जात होते. हा नाईट क्लब १६ मजली इमारतीच्या बेसमेंटमध्ये होता. गवर्नरने सांगितले की, आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. आगीत ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी अधिकांश रेनोव्हेशन कामातील मजूर होते. 

ट्रेंडिंग न्यूज

न्याय मंत्री यिलमाज तंक यांनी सांगितले की, चौकशीसाठी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये क्लबचा व्यवस्थापक व नुतनीकार्य प्रभारी व्यक्तीचा समावेश आहे. महापौर इकरेम इमामोगलू यांनी सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण इमारतीची पाहणी केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन व वैद्यकीय पथके दाखल झाली आहेत.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर